IND vs NZ: केएल राहुलला मिळणार डच्चू अन् पुणे कसोटीत Shubman Gill करणार पुनरागमन? कोच म्हणाले...

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारत २४ ऑक्टोबरपासून पुणे येथे मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. ज्यामध्ये शुभमन गिलला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
shubman  gill
shubman gillesakal
Updated on

Shubman Gill comeback in 2nd test against NZ: न्यूझीलंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना भारताने ८ विकेट्सने गमावला. २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासठी दोन्ही संघ पुण्याला दाखल झाले आहेत. दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या सामन्यासाठी फलंदाज शुभमन गिल पुर्णत: तयार असल्याचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट यांनी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मानेला व खांद्याला वेदना होत असल्याकारणाने शुभमनला न्यूझीलंडविरूद्धचा पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पण, त्यांनतर पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान शुभमन गिल भारतीय प्रशिक्षकांसोबत सराव करताना पहायला मिळाला. त्यात आता सहाय्यक प्रशिक्षकांनी सांगितल्यानंतर शुभमनच्या भारतीय संघातील स्थानावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाला आहे.

shubman  gill
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरला संघात का घेतलं? ऋषभ पंतची दुखापत अन् KL Rahulचे स्थान... टीम इंडियाच्या कोचने दिले अपडेट्स

शुभमन संघाबाहेर गेल्यानंतर न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी फलंदाज सर्फराज खानला संघात संधी देण्यात आली. सर्फराजने सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे त्याचे संघातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. अशातच केएल राहूल कसोटीमधील खराब फॉर्मशी झुंज देत आहे. तर, शुभमनने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे शुभमन गिल केएल राहूलच्या ठिकाणी संघात स्थान मिळवेल अशी शक्यता आहे.

केएल राहूलबद्दल बोलाताना रायन म्हणाले, 'नक्कीच जागा मिळवण्यासाठी संघात शर्यत आहे. सर्फराजने पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. मी सामन्यानंतर केएल राहुलशी देखील बोललो, त्याने किती बॉल मिस केले हे त्याला विचारलं. त्यावर त्याने एकही बॉल मिस न केल्याचे सांगितले.'

'केएल राहुलची लय चांगली आहे, पण तो आता पहिल्या सात क्रमांकामध्ये बसणार की नाही, हे पाहावे लागेल. त्यामुळे नक्कीच संघात जागा मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.' रायन पुढे म्हणाले.

shubman  gill
ICC Recommendations : Jay Shah यांच्यासाठी नियमात बदल, डे-नाईट कसोटीला प्राधान्य अन् वन डेत पहिल्या २५ षटकांत २ चेंडूंचा वापर

वॉशिंग्टन सुंदरची भारतीय कसोटी संघात निवड

वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देण्याबाबत रायन यांनी सांगितले, 'रणजी ट्रॉफी स्पर्धेमधील चांगल्या कामगिरी मुळे त्याला संघात स्थान देण्यात येत आहे. त्याने नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तामिळनाडू संघाकडून खेळताना १५२ धावांची दीडशतकी खेळी केली होती व त्याला विकेट्सही मिळाल्या होत्या. त्याचबरोबर डावखुऱ्या फलंदाजांना रोखण्यासाठी, फलंदाजापासून बॉल लांब ठेवणाऱ्या एका गोलंदाजांची गरज होती. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.