Shubman Gill Captaincy: 'गिलला कॅप्टनसी जमत नाही...' दिग्गज फिरकी गोलंदाजाने थेट BCCIवर मोठे आरोप! Video Viral

Amit Mishra on Shubman Gill Captaincy Viral Video: टीम इंडियाची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं. यजमान झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना भारताने 13 धावांनी गमावला असला तरी त्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत मालिका 4-1 अशी जिंकली.
Amit Mishra on Shubman Gill Captaincy
Amit Mishra on Shubman Gill Captaincysakal
Updated on

Amit Mishra on Shubman Gill Captaincy: टीम इंडियाची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं. यजमान झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना भारताने 13 धावांनी गमावला असला तरी त्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत मालिका 4-1 अशी जिंकली. या कामगिरीबद्दल गिलच्या कर्णधारपदाचे कौतुक केले पाहिजे, पण भारतीय संघाचा भाग असलेल्या अमित मिश्राने गिलच्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Amit Mishra on Shubman Gill Captaincy
Virat Kohli : 'ज्या चिकूला मी ओळखत होतो तो...' कोहलीवर दिग्गज भारतीय क्रिकेटरची टीका, रोहितबद्दल मात्र...

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमित मिश्रा रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत आणि टीम इंडियाशी संबंधित जवळपास सर्वच बाबींवर मोकळेपणाने बोलला. यावेळी त्याने शुभमन गिलच्या कर्णधारपदावरही भाष्य केले.

अमित मिश्राला गिलबाबत विचारण्यात आले की, शुभमन गिलला कर्णधारपद देण्याबाबत तुझे काय मत आहे. यावर तो म्हणाला की, "मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर त्याला कर्णधार केले नसते. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधारपद कसे हाताळायचे हे माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पनाही नाही."

Amit Mishra on Shubman Gill Captaincy
Hardik Pandya श्रीलंका दौऱ्यातील वन डे मालिकेत नाही खेळणार, BCCI ला विनंती; जाणून घ्या कारण

अमित मिश्राच्या या वक्तव्यामुळे शुबमन गिलच्या कर्णधारपदावर थेट प्रश्न उपस्थित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बीसीसीआयवरही प्रश्न उपस्थित होत आहेत, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला टी-20 संघाचे कर्णधारपद कोणी दिले?

शुभमन गिलने 2019-2020 दुलीप ट्रॉफीमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले होते. काही सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त त्याला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. आयपीएल 2024 मध्ये त्याला गुजरात टायटन्सचे कर्णधारपद मिळाले, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ आठव्या स्थानावर राहिला. याशिवाय गिलला कुठेही कर्णधारपदाचा अनुभव नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.