IND vs BAN: 'ऑफिसिअल ID है, बाकी सब फेक', शुभमन गिलने लाईव्ह सामन्यात उडवली सिराजची खिल्ली, Video Viral

Shubman Gill, Mohammed Siraj Share Hilarious Moment Viral Video: भारत विरुद्ध बांगलादेश संघातील चेन्नई कसोटी दरम्यान शुभमन गिल मोहम्मद सिराजची खिल्ली उडवताना दिसला होता.
Mohammed Siraj - Shubman Gill Funny Moments
Mohammed Siraj - Shubman Gill Funny MomentsSakal
Updated on

Viral Video India vs Bangladesh 1st Test: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध चेन्नईला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे.

दरम्यान या सामन्यातील अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची खिल्ली उडवताना दिसला होता.

Mohammed Siraj - Shubman Gill Funny Moments
IND vs BAN Records : भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीत नोंदवले गेले ९ भारी विक्रम, R Ashwin ने वर्ल्ड रेकॉर्ड केला

या सामन्यात भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शान्तो आणि मोमिनूल हक करत होते. यावेळी गिल सिराजची खिल्ली उडवताना म्हणताना दिसला की 'मोहम्मद सिराज ऑफिशियल ID आहे, बाकी सर्व फेक आहे.' त्याचा हा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला आहे.

खरंतर मोहम्मद सिराजने आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वी एका जुन्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सांदितले होते की त्याचं खरं अकाऊंट कोणतं आहे आणि बाकी सर्व खोटे आहेत. यावरूनच गिल त्याची खिल्ली उडवत असल्याचे समजून येत आहे.

Mohammed Siraj - Shubman Gill Funny Moments
'सो गये क्या सब?', कर्णधार Rohit Sharma फिल्डर्सवर भडकला, चेन्नई कसोटीतील Video Viral

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित केला होता. या डावात गिलने नाबाद ११९ धावा केल्या होत्या, तर ऋषभ पंतने १०९ धावा केल्या होत्या.

भारताने पहिल्या डावात २२७ धावांची आघाडी घेतलेली असल्याने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला ६२.१ षटकात सर्वबाद २३४ धावाच करता आल्या.

तत्पुर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या.भारताकडून आर अश्विनने ११३ धावांची शतकी केल्या. रविंद्र जडेजान ८६ धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालने ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर बांगलादेशला पहिल्या डावात १४९ धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात सिराजने २ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.