Sikandar Raza : रझा ने दिली सज़ा! सिकंदरने मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; झिम्बाब्वेने भारतालाही टाकलं मागे

Zimbabwe vs Gambia T20I : नैरोबीच्या रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील विश्वविक्रमी कामगिरी केली.ICC पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता ब गटातील गांबिया विरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने चौकार-षटकारांची आतषबाजी केली.
Sikandar Raza
Sikandar Raza esakal
Updated on

fastest hundred in T20Is Zimbabwe World Record : झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च ४ बाद ३४४ अशी धावसंख्या उभी केली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये नेपाळने आशियाई क्रीडा स्पर्धेत हांगझोऊ येथे मंगोलियाविरुद्ध ३ बाद ३१४ धावा केल्या होत्या आणि त्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या होत्या. प्रथमच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने ३०० पार धावा केल्या होत्या आणि आज हे दोन्ही विक्रम झिम्बाब्वेने मोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.