T20 World Cup साठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; एलिसा हेली कर्णधार, तर 'या' खेळाडूकडे उपकर्णधारपद

Australia Squad for Women's T20 World Cup 2024: महिला टी२० वर्ल्ड कपसाठी सहावेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघ जाहीर झाला आहे.
Australia Women Cricket team
Australia Women Cricket teamSakal
Updated on

Australia Squad for Women's T20 World Cup 2024: ऑक्टोबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे महिला टी२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी आता अवघ्या एका महिन्याचा कालावधी राहिला आहे. अशात आता सहावेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचीही घोषणा झाली आहे.

यंदा टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व एलिसा हेली करणार आहे. गेल्यावर्षी मेग लॅनिंगने निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हेलीच्या हाती सोपवण्यात आली आहे.

तसेच या टी२० वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा हिच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाची उपकर्णधार म्हणून दबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Australia Women Cricket team
बाप्पा मोरया! T20 World Cup ट्रॉफी घेऊन रोहित, जय शाह पोहचले सिद्धीविनायकाच्या चरणी, Photo
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.