Jasprit Bumrah ला का केलं कसोटी संघाचा उपकर्णधार? रोहित शर्मानं सांगितली मन की बात

Rohit Sharma on Vice Captain Jasprit Bumrah: बुधवारपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
Team India | Jasprit Bumrah - Rohit Sharma
Team India | Jasprit Bumrah - Rohit SharmaSakal
Updated on

India vs New Zealand Test Series: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

दरम्यान, या मालिकेसाठी बीसीसीआयने जसप्रीत बुमराहकडे अधिकृतरित्या उपकर्णधारपद दिले आहे. म्हणजेच आता कर्णधार रोहित शर्मासह बुमराहही त्याच्याबरोबर काम करताना दिसेल. बुमराहला आत्तापर्यंत फारसा नेतृत्वाचा अनुभव नसला, तरी तो बऱ्याच काळापासून भारतीय संघाच्या लीडरशीप ग्रुपचा भाग असल्याचे रोहितने म्हटले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित पत्रकारपरिषदेसाठी उपस्थित होता. त्यावेळी त्याला बुमराहच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Team India | Jasprit Bumrah - Rohit Sharma
IND vs NZ: सिराज OUT, कुलदीप IN! टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध 'सॉलिड' प्लान; जाणून घ्या कशी असेल Playing XI

यावर रोहित म्हणाला, 'हे पाहा, बुमराहने आत्तापर्यंत खूप क्रिकेट खेळले आहे. मी त्याच्याबरोबर खूप क्रिकेट खेळलोय. तो खेळ चांगला समजतो. तो हुशार आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलता, तेव्हा तुम्हाला लक्षात येते की तो चांगला खेळ समजतो.'

'त्याने खूप सामन्यात नेतृत्व केले नाही, त्यामुळे मी तांत्रिकबाबीबद्दल फार सांगू शकत नाही. मला वाटते त्याने एक कसोटी आणि काही टी२० सामन्यात नेतृत्व केले आहे.'

रोहित पुढे म्हणाला, 'मला वाटते बुमराहला कशाची गरज आहे, हे समजते. जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्णधाराने पुढे यावे असं वाटत असतं, त्यावेळी पुढे येऊ शकणाऱ्यांपैकी एक बुमराह आहे. त्यामुळे गेल्या बऱ्याच काळापासून तो आमच्या लीडरशीप ग्रुपचा भाग देखील आहे.'

रोहित असंही म्हणाला की 'संघात नवीन येणाऱ्या गोलंदाजांना मार्गदर्शन करणे असो किंवा संघ म्हणून अजून पुढे कसं जाता येईल, याची चर्चा करणे असो, तो नेहमीच आमच्या लीडरशीप ग्रुपचा भाग राहिला आहे. त्यामुळे तो आजुबाजूला असणे योग्य आहे.'

Team India | Jasprit Bumrah - Rohit Sharma
अनफिट Mohammed Shami, आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचा नाही; Rohit Sharma स्पष्टच म्हणाला

रोहित असंही म्हणाला, 'प्रत्येक संघ वेगळे आव्हान घेऊन येते. न्यूझीलंड देखील वेगळे आव्हान देईल. त्यांच्याविरुद्ध आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यांच्या खेळाडूंना आम्ही ओळखतो. त्यांचे बलस्थान आणि कमकूवत बाजू आम्हाला माहित आहेत.'

'पण महत्त्वाचं हे आहे की आम्ही मागच्या मालिकेपेक्षा या मालिकेत काय चांगलं करू शकतो. प्रतिस्पर्धी कोणीही असो आम्ही कसे आणखी चांगले खेळू शकतो, यावर लक्ष अधिक आहे. प्रतिस्पर्ध्यांवर अधिक लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमच्या संघावर अधिक लक्ष देणार आहे.'

त्याचबरोबर रोहितने मोहम्मद शमीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील समावेशावरही प्रश्नचिन्ह असल्याचे म्हटले आहे. सध्या त्याच्या गुडघ्याला सुज असल्याचे त्याने सांगितले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूला झाल्यानंतर दुसरा सामना पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे २४ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.