Sri Lanka vs New zealand second test: न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. पहिला सामना श्रीलंकेने ६३ धावांनी जिंकला आणि आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने शानदार सुरूवात केली. पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या कमिंदू मेंडिसने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. पण, पहिल्या दिवसाचा खेळ हा शतकवीर दिनेश चंडिमलच्या नावावर राहिला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर पथूम निसंका ( १) पहिल्याच षटकात माघारी परतला. दिमुथ करुणारत्ने व चंडिमल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. दिमुथ ४६ धावांवर माघारी परतला. चंडिमल याला अनुभवी अँजलो मॅथ्यूजची साथ मिळाली आणइ दोघांनी २०२ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. चंडिमलने १०८ चेंडूत शतक पूर्ण केले. तो २०८ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने ११६ धावांवर बाद झाला.
पहिल्या दिवसाखेर मॅथ्यूज ७८ धावांवर, तर मेंडिस ५१ धावांवर नाबाद आहे. श्रीलंकेच्या ३ बाद ३०६ धावा झाल्या आहेत. मेंडिसने अर्धशतक झळकावून नवा विक्रम रचला आहे. कसोटी क्रिकेटमधील पदार्पणानंतर सलग ८ अर्धशतके करणारा मेंडिस हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या सौद शकीलचा सगल ७ अर्धशतकांचा विक्रम मोडला आहे.
१) ऑस्ट्रेलिया विरूद्ध २०२२ मध्ये ६१ धावा
२) बांगलादेश विरूद्ध २०२४ मध्ये १०१ व १६४ धावा
३) बांगलादेश विरूद्ध २०२४ मध्ये ९२ धावा
४) इंग्लंड विरूद्ध २०२०४ मध्ये ११३ धावा
५) इंग्लंड विरूद्ध २०२०४ मध्ये ७४ धावा
६) इंग्लंड विरूद्ध २०२०४ मध्ये ६४ धावा
७) न्यूझीलंड विरूद्ध २०२०४ मध्ये ११४ धावा
८) न्यूझीलंड विरूद्ध २०२०४ मध्ये ५१ धावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.