SL vs WI ODI: वेस्ट इंडिजच्या शेपटाने झोडले! ९व्या विकेटसाठी १९९ धावा जोडल्या; तरीही श्रीलंकेने डाव साधला, जिंकली मालिका

Sri Lanka vs West Indies 2nd ODI: श्रीलंका क्रिकेट संघ गेल्या काही दिवसात चांगली कामगिरी केली असून आता त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकाही जिंकली आहे. तरी दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजसाठी ९ व्या विकेटसाठी झालेली भागीदारी लक्षवेधी ठरली होती.
Sri Lanka vs West India ODI
Sri Lanka vs West India ODISakal
Updated on

Sri Lanka vs West Indies ODI: वेस्ट इंडिज संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून सध्या या दोन संघात वनडे मालिका सुरू आहे . या मालिकेतील बुधवारी (२३ ऑक्टोबर) पाल्लेकेले येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने ५ विकेट्सने विजय मिळवत मालिका खिशात घातली.

हा सामना श्रीलंकन गोलंदाजांनी आणि वेल्ट इंडिजच्या शेर्फेन रुदरफोर्ड आणि गुडाकेश मोती या जोडीने गाजवला.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. परंतु, वेस्ट इंडिजची सुरुवात अत्यंत खराब झाली. श्रीलंकेकडून मध्यमगती गोलंदाज असिथा फर्नांडो आणि फिरकीपटू महिश तिक्षणा यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सळो की पळो केले.

पहिल्या ४ षटकातच ऍलिक एथानाज (१) आणि ब्रेंडन किंग(१६) या सलामीवीरांना स्वस्तात विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार शाय होप (५), केसी कार्टी (६), रोस्टर चेस (८), रोमारियो शेफर्ड (४) हे फलंदाजही फार काही करू शकले नाहीत आणि १५ षटकांच्या आतच विकेट्स गमावत माघारी परतले. हसरंगानेही असिथा फर्नांडो आणि तिक्षणा यांना गोलंदाजीत चांगली साथ दिली.

Sri Lanka vs West India ODI
IND vs NZ: पुण्यात कोरड्या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला? आजपासून भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.