Asia Cup Semi Final : श्रीलंकेचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानला पाजले पाणी; १ चेंडू राखून पोहोचले फायनलमध्ये

Sri Lanka beat Pakistan in Asia cup Semi : आशिया चषक स्पर्धेतील दुसरी उपांत्य फेरीची लढत रोमहर्षक झाली. यजमान श्रीलंकेला फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना करावा लागणार आहे.
India vs Sri Lanka in Asia cup final
India vs Sri Lanka in Asia cup finalsakal
Updated on

Sri Lanka Women vs Pakistan Women Asia Cup 2024 - श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातली महिला आशिया चषक स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत चुरशीची झाली. विजयासाठी १४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला शेवटच्या चेंडूपर्यंत पाकिस्तानने झुंजवले. शेवटच्या ६ चेंडूंत यजमान संघाला विजयासाठी ३ धावा करायच्या होत्या, परंतु अनुभवी गोलंदाज निदा दार ( Nida Dar) ने पहिल्या ३ चेंडूंत एकही धाव न देता विकेट मिळवली. त्यामुळे सामना ३ चेंडू ३ धावा असा आला. अखेर १ चेंडू राखून श्रीलंकेच्या महिला संघाने बाजी मारली.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १४० धावा केल्या. गुल फेरोजा ( २५) आणि मुनीबा अली ( ३७) यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. उदेशिका प्रबोधनीने या दोन्ही ओपनर्सना माघारी पाठवले. त्यानंतर अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार निदा दारने २३ आणि फातिमा सनाने नाबाद २३ धावा केल्या. आलिया रियाझने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून प्रबोधनी व कविशा दिहारी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

India vs Sri Lanka in Asia cup final
Paris Olympic 2024: ऐतिहासिक ऑलिंपिक उद्घाटनच्या काही तासांपूर्वीच पॅरिस रेल्वेवर 'हल्ला'

प्रत्युत्तरात श्रीलंकेचे आघाडीचे ४ फलंदाज ७८ धावांत माघारी परतले. कर्णधार चमारी अटापट्टू ( Chamari Athapaththu ) एका बाजूने खिंड लढवत होती. संघाला विजयासाठी २१ धावांची गरज असताना चमारीला माघारी पाठवण्यात पाकिस्तानी गोलंदाज सादिया इक्बालला यश आले. चमारीने ४८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६३ धावांची खेळी केली. श्रीलंकेला २६ चेंडूंत या २१ धावा करायच्या होत्या, परंतु त्यांच्या विकेट्स पडत गेल्या. अनुष्का संजीवनी मैदानावर उभी राहिली. तिने २२ चेंडूंत नाबाद २४ धावांची खेळी करून मॅच जिंकून दिली. शेवटच्या ३ चेंडूंत ३ धावांची गरज असताना निदाकडून वाईड चेंडू गेला अन् १९.५ चेंडूवर श्रीलंकेने ३ विकेट्स राखून विजयी धाव घेतली.

India vs Sri Lanka in Asia cup final
Women's Asia Cup: टीम इंडियाची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री! स्मृती मानधनाची अर्धशतकासह विक्रमाला गवसणी

श्रीलंका आणि भारत यांच्यात फायनल होणार आहे. भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशच्या महिला संघाला १० विकेट्स व ५४ चेंडू राखून सहज विजय मिळवला. बांगलादेशचे ८१ धावांचे लक्ष्य स्मृती मानधना ( ५५) व शफाली वर्मा ( २६) यांच्या नाबाद खेळीने सहज पार केले. भारताच्या रेणुका शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.