Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे लागोपाठ दुसरे शतक; मिताली राजच्या विक्रमाशी केली बरोबरी

INDW vs SAW: स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 136 धावांची शतकी खेळी केली.
Smriti Mandhana
Smriti Mandhana INDW vs SAW Sakal
Updated on

Smriti Mandhana INDW vs RSAW : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. तिने 120 चेंडूत 136 धावा चोपून एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी देखील केली. स्मृती मानधनाने मिताली राजच्या भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. स्मृती मानधनाने फक्त 84 डावात हा कारनामा केला आहे.

भारताकडून वनडे सामन्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या महिला क्रिकेटपटू

  • स्मृती मानधना - 84 डावात 7 वनडे शतके

  • मिताली राज - 211 डावात 7 वनडे शतके

  • हरमनप्रीत कौर - 114 डावात 6 वनडे शतके

याचबरोबर स्मृती ही वनडे क्रिकेटमध्ये पाठोपाठ शतकी खेळी करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.

तसेच तिची 136 धावांची खेळी ही वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची वैयक्तिक सर्वोच्च खेळी ठरली.

Smriti Mandhana
Haris Rauf Controversy : रौऊफच्या 'त्या' प्रकरणात रिझवान पाठीशी राहिला उभा, मात्र भारतीय चाहत्यांनी केला आडवा

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली होती. त्या सामन्यात स्मृतीने 117 धावांची खेळी केली होती. आता दुसऱ्या सामन्यातही स्मृतीने 120 चेंडूत 136 धावांची शतकी खेळी केली. भारताने पहिला सामना 143 धावांनी जिंकला होता.

दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 3 बाद 325 धावा केल्या. सलामीवीर शफाली वर्मा 20 धावा करून बाद झाल्यावर स्मृतीने हेमलतासोबत भागीदारी रचत संघाला शंभरी पार करून दिली.

Smriti Mandhana
Gautam Gambhir: गौतम गंभीर कोच झाल्यावर बदलणार टीम इंडियाचे चित्र; रोहित-विराटचं भविष्य काय?

त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी उपकर्णधार स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 171 धावांची दमदार भागीदारी रचली. स्मृतीने 18 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 120 चेंडूत 136 धावा केल्या. स्मृती 46 व्या षटकात बाद झाली. त्यानंतर हमनप्रीत कौरने नाबाद 103 धावांची खेळी करत भारताला 325 धावांपर्यंत पोहचवलं. रिचा घोषने 13 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.