Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Smriti Mandhana gave updates on Harmanpreet Kaur Injury: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर खेळणार की नाही, याबाबत स्मृती मानधनाने अपडेट्स दिले आहेत.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamSakal
Updated on

Women's T20 World Cup 2024, India vs Sri Lanka: संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होते असलेल्या महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतासाठी करो वा मरो अशाच स्थितीतील आहे. दुबईला होणारा हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता चालू होणार आहे.

या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. पहिल्याच सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तसेच पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला असला, तरी भारतीय संघाची फलंदाजी धीम्या गतीने झाली होती. त्यामुळे या दोन्ही सामन्यांचा फटका भारताला नेट रन रेटमध्ये बसला आहे.

भारतीय संघ सध्या अ गटाच्या पाँइंट्स टेबलमध्ये २ गुणांसह आणि -१.२१७ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुढे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आहे. त्यामुळे आता भारताला आता स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचे असेल, तर श्रीलंकेविरुद्ध मोठ्या विजयाची गरज आहे.

अशातच भारताला कर्णधार हरमनप्रीत कौरसह काही खेळाडूंच्या दुखापतीचीही चिंता आहे. आता याबाबतच भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने प्रतिक्रिया दिली आहे.

India Women Cricket Team
Women's T20 World Cup: भारताच्या सेमीफायनलच्या मार्गात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामना ठरणार निर्णायक, जाणून घ्या समीकरण

याबरोबरच तिने एक आनंदाची बातमीही दिली की हरमनप्रीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी तंदुरुस्त झाली असून सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. रविवारी (६ ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना हरमनप्रीतच्या मानेला दुखापत झाली होती. पण आता ती तंदुरुस्त असून बुधवारी खेळताना दिसणार आहे.

मात्र, पुजा वस्त्राकरच्या खेळण्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. अष्टपैलू पुजा वस्त्राकरला दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळता आले नव्हते.

मानधनाने सांगितले आहे की पुजाच्या दुखापतीवर मेडिकल टीम उपचार करत असून तिला श्रीलंकेविरुद्ध खेळवायचे की नाही, याचा निर्णय सामन्याच्या आधी घेतला जाईल. त्याचबरोबर राधा यादवला कोणतीही दुखापत नसल्याचेही मानधनाने स्पष्ट केले.

India Women Cricket Team
Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागली; नक्की काय झालं?

नेट रन रेटची चिंता आहेच, पण...

भारताच्या नेट रन रेटबद्दल बोलताना मानधना म्हणाली, 'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान नेट रन रेटचा विचार आमच्या डोक्यात होता. पण येथे युएईमध्ये परिस्थिती वेगळी आहे. धावा झटपट करणे फार सोपे नाही.

'पहिले प्राधान्य सामना जिंकाण्यासाठी होते आणि संघासाठी काय योग्य आहे व नेट रट रन रेटबाबत काय करता येईल, यात समतोलता राखणे महत्त्वाचे होते. मी सुरुवात चांगली केली होती. पण नंतर मी खूप डॉट बॉल खेळले, जे माझ्यासाठीही त्रासदायक होतं.'

'आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जाऊन आणि आक्रमक खेळू असा विचार करून फलंदाजी करू शकत नाही, कारण परिस्थिती आणि खेळपट्टी कठीण आहेत. त्या परिस्थितीत नेट रन रेटचा विचार करण्यापेक्षा आमचे प्राधान्य विजय मिळवण्याला होते.

आमच्या गट नक्कीच कठीण आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. आम्हाला फार पुढचा विचार करायचा नाहीये. एका वेळी एकाच सामन्याचा विचार करायचा आहे.'

India Women Cricket Team
Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

याबरोबर भारतीय संघात पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी क्रमवारीत बदल झाल्याचे दिसले. न्यूझीलंडविरुद्ध हरमनप्रीतने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती, तर पाकिस्तानविरुद्ध जेमिमाह रोड्रिग्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरली होती.

याबाबत मानधनाने सांगितले की सामन्यातील स्थिती आणि खेळपट्टी पाहून जे गरजेचे आहे, तसा बदल करण्यात आला होता. तसेच तिसरा क्रमांक हा सामन्याच्या परिस्थितीनुसार बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.