Smriti Mandhana : भारतीय महिला संघाचे निर्भेळ यश;स्मृती मानधनाच्या विक्रमी ३४३ धावा

भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी व दीप्ती शर्मा यांच्या प्रभावी गोलंदाजीनंतर स्मृती मानधनाच्या (९० धावा) आणखी एका धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकन संघावर सहा विकेट व ५६ चेंडू राखून मात केली आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असे घवघवीत यश संपादन केले.
Smriti Mandhana
Smriti Mandhanasakal
Updated on

बंगळूर : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी व दीप्ती शर्मा यांच्या प्रभावी गोलंदाजीनंतर स्मृती मानधनाच्या (९० धावा) आणखी एका धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकन संघावर सहा विकेट व ५६ चेंडू राखून मात केली आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असे घवघवीत यश संपादन केले.

दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय संघासमोर २१६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने पहिल्या दोन लढतींत शतक झळकावले होते. याही लढतीत तिने आपला शानदार फॉर्म कायम राखला. तिने ८३ चेंडूंमध्ये ९० धावांची खेळी साकारली. या खेळीत तिने ११ चौकार मारले, पण सलग तिसरे शतक करण्यापासून ती वंचित राहिली. तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक ३४३ धावा करण्यात तिला यश मिळाले. शेफाली वर्मा (२५ धावा), प्रिया पुनिया (२८ धावा), हरमनप्रीत कौर (४२ धावा), जेमिमा रॉड्रिग्स (नाबाद १९ धावा) यांनी छोट्या पण महत्त्वाच्या धावा केल्या. भारतीय संघाने सहा विकेट राखून यश मिळवले.

त्याआधी लॉरा वॉलवॉर्ड्‌ट हिने ६१ धावांची आणि तॅझमिन ब्रिट्‌स हिने ३८ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकन संघाने आठ बाद २१५ धावा उभारल्या. भारताकडून दीप्ती शर्मा व अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. श्रेयांका पाटील व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक ­­: दक्षिण आफ्रिका- ५० षटकांत आठ बाद २१५ धावा (लॉरा वॉलवॉर्ड्‌ट ६१, तॅझमिन ब्रिट्‌स ३८, एन. दी क्लार्क २६, माईक दी रायडर नाबाद २६, दीप्ती शर्मा २/२७, अरुंधती रेड्डी २/३६) पराभूत वि. भारत - ४०.४ षटकांत चार बाद २२० धावा (स्मृती मानधना ९०, शेफाली वर्मा २५, प्रिया पुनिया २८, हरमनप्रीत कौर ४२, जेमिमा रॉड्रिग्स नाबाद १९).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.