Smriti Mandhana : स्मृतीची शतकांची हॅट्ट्रिक हुकली! भारताने मात्र तिसरा विजय साजरा करत दक्षिण आफ्रिकेला दिला व्हाईट वॉश

India Women's Vs South Africa Women's : भारतीय महिला क्रिकेट संघाची रन मशिन म्हणून स्मृती मानधना उदयास येत आहे.
Smriti Mandhana
Smriti Mandhana INDW vs RSAWesakal
Updated on

Smriti Mandhana INDW VS RSAW : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील तिसरा वनडे सामना आज खेळवला गेला. या सामन्यात भारताच्या स्मृती मानधनाने दमदार फलंदाजी करत शतकी खेळी केल अशी आशा होती. मात्र 83 चेंडूत 90 धावा केल्यानंतर तिला मलाबाने बाद केलं. यामुळं सलग तिसरे शतक ठोकून विक्रम करण्याचे स्वप्न धुळीस मिळालं. भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा वनडे सामना 6 विकेट्स राखून जिंकला. भारताने आफ्रिकेला व्हाईट वॉश देत मालिका 3 - 0 अशी जिंकली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फंलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 215 धावात रोखलं. आफ्रिकेची कर्णधार व्होलवार्डट आणि तझमीन ब्रिट्सने शतकी सलामी दिली. कर्णधार व्होलवार्डटने 57 चेंडूत 61 धावांची तर ब्रेट्सने 38 धावांची खेळी केली.

मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत आफ्रिकेची अवस्था 5 बाद 143 धावा अशी केली. दरम्यान नादिने क्लर्क (26 धावा) आणि रिडेर (26 धावा) यांनी चांगली खेळी करत 200 च्या पार पोहचवलं. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताने आफ्रिकेच्या 215 धावांचे आव्हान पार करताना दमदार सुरूवात केली. स्मृती मानधना आणि शफाली वर्माने 61 धावांची सलामी दिली. शफाली 25 धावा करून बाद झाल्यानंतर प्रिया पुनियाने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या स्मृतीला चांगली साथ दिली. या दोघींनी भारताला 123 धावांपर्यंत पोहचवलं.

पुनियाने 28 धावा करून स्मृतीची साथ सोडली. दरम्यान, स्मृती ही आपल्या सलग तिसऱ्या शतकाच्या दिशेने कूच करत होती. हरमनसोबत स्मृतीने भारताला 170 धावांच्या पार पोहचवले. ती देखील 90 धावांवर पोहचली होती. मात्र मलाबाने स्मृतीला बाद करत तिची शतकांची हॅट्ट्रिक होऊ दिली नाही.

स्मृती मानधना बाद झाल्यानंतर हरमनप्रती कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी भारताला 200 धावांच्या पार पोहचवलं. हरमनप्रीत कौरने 42 तर जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद 19 धावा केल्या कौर बाद झाल्यावर रिचा घोषने षटकार मारत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची वनडे मालिका 3 - 0 अशी खिशात टाकली. आता हे दोन्ही संघ 28 जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहेत. त्यानंतर 5 जुलैपासून तीन टी 20 सामन्यांची मालिका ही खेळवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.