Smriti Mandhana: 'आता ए साला कप नामदू म्हणायचं', RCB च्या विजयानंतर असं का म्हणाली मानधना?

RCB won WPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर कर्णधार स्मृती मानधनाने दिलेल्या प्रतिक्रियेने अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे.
RCB won WPL 2024
RCB won WPL 2024Sakal
Updated on

RCB Won WPL 2024: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने जिंकले. रविवारी (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला 8 विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. यानंतर स्मृती मानधनाने दिलेल्या प्रतिक्रियेची खूप चर्चा झाली.

मानधनाने विजयानंतर बोलताना बेंगळुरूच्या चाहत्यांना खास संदेश दिला. ती म्हणाली, 'एक वाक्य नेहमी म्हटलं जातं, ए साला कप नामदे, पण आता ए साला कप नामदू असं म्हणलं पाहिजे. कन्नड मी माझी मातृभाषा नाही, पण चाहत्यांसाठी हे म्हणणे गरजेचे आहे.'

RCB won WPL 2024
RCB Win WPL 2024 : ट्रॉफी ताफ्यात आली रे...! बंगळुरू चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने स्मृतीला केला व्हिडिओ कॉल

खरंतर बेंगळुरू संघाचं 'ए साला कप नामदे' हे घोषवाक्य आहे. ते आयपीएल आणि डब्ल्युपीएलवेळी वापरलं जातं. 'यावर्षी कप आमचा असेल' असा त्या वाक्याचा मराठीत अर्थ होतो. पण आता बेंगळुरूने विजेतेपद जिंकले असल्याने स्मृतीने त्या वाक्यातील नामदे शब्दाऐवजी नामदू शब्द वापरला, ज्यामुळे त्या वाक्याचा अर्थ झाला 'यावर्षी कप आमचा आहे.'

दरम्यान सामन्यानंतर मानधना म्हणाली, 'हे खरंच झालंय, हे अजूनही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. भावना व्यक्त करणे कठीण आहे. मी इतकेच म्हणेल की मला या संघाचा अभिमान आहे. आमच्यासाठी बेंगळुरूचा लेग खूप चांगला राहिला. दिल्लीमध्ये आल्यानंतर आम्हाला दोन अटीतटीच्या पराभवांना सामोरे जावे लागले.'

'आम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याबद्दल आम्ही चर्चा केली होती. यासांरखे काही स्पर्धा असतात, ज्यात तुम्हाला योग्यवेळी चांगली कामगिरी करावी लागते. गेल्यावर्षाच्या हंगामाने आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या होत्या.'

RCB won WPL 2024
R Ashwin: 'त्यांनी विचारलं त्याला CSK संघात घेणार नाही का?', अश्विनने ऐकवला पहिल्या IPL चा किस्सा

ती पुढे म्हणाली, 'संघव्यवस्थापनाने सांगितले होते की हा तुझा संघ आहे, तू त्याला बनव. त्यामुळे त्यांचे आभार. आरसीबीसाठी हे खुप मोठे यश आहे. ट्रॉफी फक्त मी नाही,तर संघाने जिंकली आहे. मला काय वाटते हे सांगणारी व्यक्ती मी नाही. हा विजय माझ्या पहिल्या पाचमध्ये असेल, नक्कीच वर्ल्डकप यात पहिल्या क्रमांकावर येईल.'

अंतिम सामन्यात दिल्लीने बेंगळुरूसमोर विजयासाठी 114 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बेंगळुरूने 19.3 षटकात 2 विकेट्स गमावत 115 धावा करून सहज पूर्ण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.