INDW vs RSAW : शाब्बास मुलींनो! स्मृती अन् शफालीनं 90 वर्षाच्या इतिहासात जे झालं नाही ते करून दाखवलं

Smriti Mandhana And Shafali Verma Record Highest Opening Partnership In Women's Test Cricket: स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेतील फॉर्म कसोटीत देखील कामय राखला.
Smriti Mandhana
Smriti Mandhana Shafali verma Test Recordesakal
Updated on

Smriti Mandhana Shafali verma Test Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी महिला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी या दोघींनी 250 धावांची दमदार सलामी देत विश्वविक्रम केला.

महिला कसोटी क्रिकेटच्या 90 वर्षाच्या इतिहासात कोणत्याही सलामी जोडीला पहिला विकेटसाठी 250 धावांची सलामी देता आली नव्हती. मात्र स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी हा इतिहास घडवला.

Smriti Mandhana
Shafali Varma : कशी होणार फायनल... टीम इंडियाच्या मुलींनी दाखवली झलक, शफालीनं ठोकलं पहिलं कसोटी शतक

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताच्या सालमी जोडीनं दमदार सुरूवात केली.

स्मृती मानधना आणि शफली वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पहिल्या दोन सत्रातच जेरीस आणलं. या दोघींनी आक्रमक फलंदाजी करत 292 धावांची खणखणीत सलामी दिली. यात स्मृती मानधनाचे 149 धावांचे योगदान राहिले. तिचे दीडशतक अवघ्या एक धावेने हुकले. दुसरीकडे शफाली वर्माने 150 धावा करत आपलं पहिलं वहिलं कसोटी शतक मोठं केलं.

सामन्याच्या पहिल्या दिवशीचे दुसरे सत्र संपवण्यापूर्वी भारताने 56 षटकात 1 बाद 312 धावांपर्यंत मजल मारली होती. शफाली वर्मा 166 चेंडूत 155 धावा करून नाबाद होती. तर शुभा सतीशने 12 चेंडूत 6 धावा केल्या होत्या.

Smriti Mandhana
T20 WC 24 Final : बार्बाडोसमधून मोठी अपडेट! IND vs SA फायनल सामना होणार रद्द? इतक्या टक्के आहे पावसाची शक्यता

स्मृतीच्या कसोटीतील 500 धावा देखील पूर्ण

स्मृती मानधनाने कसोटीतील आपल्या 500 धावा देखील पूर्ण केल्या. विशेष म्हणजे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 500 धावा करणारी स्मृती ही फक्त दुसरी बॅटर आहे. यापूर्वी भारताची माजी कर्णधार मिताली राजने अशी कामगिरी केली होती.

स्मृतीने मितालीचा अजून एक विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मितालीच्या नावावर होता. तिने 87 चौकार मारले होते. तो विक्रम आता स्मृतीच्या नावावर असून तिचे कसोटीत 90 चौकार झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.