ना आशिष शेलार, ना राजीव शुक्ला! Jay Shah यांच्या जागी BCCI चा सचिव होणार BJP नेत्याचा मुलगा

Jay Shah likely to ICC chairman: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण, मग BCCI चे सचिव कोण?
Jay Shah icc chairman
Jay Shah icc chairmanesakal
Updated on

ICC Chairman Jay Shah BCCI Secretary: आयसीसीचे सध्याचे प्रमुख ग्रेग बार्क्ले यांनी तिसऱ्या टर्मसाठी इच्छुक नसल्याचे जाहीर करताच या पदासाठी जय शाह यांचे नाव चर्चेत आले आहे. बार्क्ले यांची टर्म ३० नोव्हेंबरला संपत आहे. जय शाह या पदासाठी अर्ज करतात का, हे २७ ऑगस्टला होणाऱ्या ICC च्या बैठकीत हे निश्चित होईल. पण, जय शाह हे जर आयसीसीचे अध्यक्ष झाले, तर बीसीसीआयच्या सचिवपदाची जागा रिक्त होईल आणि मग त्या जागेवर कोण? हा प्रश्न उपस्थित होतो.

ICC च्या प्रमुखपदासाठी जय शहा यांना १६ पैकी १५ बोर्ड सदस्यांचे समर्थन आहे आणि त्यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यास त्यांचा विजय निश्चित आहे. पण, BCCI मधील त्यांच्या सचिवपदाचा एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. जय शहा आयसीसीमध्ये गेल्यास BCCIच्या सचिवपदासाठी राजीव शुक्ला, आशीष शेलार, अरुण धुमल, देवजित सैकिया आणि रोहन जेटली अशी नावे चर्चेत येऊ शकतात, असे वृत्त होते.

राजीव शुक्ला हे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. आशिष शेलार बीसीसीआयचे खजिनदार आहेत. अरुण धुमल हे आयपीएलचे अध्यक्ष आहेत आणि जगमोहन दालमिया यांचे पुत्र अविशेक दालमिया यांचेही नाव चर्चेत येत आहे.

Jay Shah icc chairman
Hardik Pandya अन् नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटामागे 'ती' नव्हे तर...

जेटली शर्यतीत आघाडीवर

जय शाह यांची सचिवपदाची जबाबदारी दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ( DDCA) प्रमुख रोहन जेटली यांच्याकडे जाण्याची शक्यता बळावली आहे. भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांचे ते पुत्र आहेत आणि दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार रोहन जेटली यांचे नाव जवळपास निश्चित आहे. रोहन जेटली यांच्या कार्यकाळात DDCA ने नुकतीच दिल्ली प्रीमिअर लीगचे आयोजन केले आहे आणि दिल्लीची ही पहिली फ्रँचायझी बेस ट्वेंटी-२० लीग आहे. या लीगमध्ये ऋषभ पंत, इशांत शर्मा, हर्षित राणा, अनुज रावत, आयुष बदोनी आणि अनेक खेळाडू खेळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.