Sourav Ganguly: क्रिकेट नाही, तर आता रेसिंगमध्येही दिसणार गांगुलीची 'दादागिरी'; कोलकाता संघाचा बनलाय मालक

Sourav Ganguly: गांगुलीने कोलकता रॉयल टायगर्स रेसिंग टीमचे मालकी हक्क खरेदी केले आहेत.
Sourav Ganguly Racing Team
Sourav Ganguly Racing TeamSakal
Updated on

Sourav Ganguly: इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा नवीन सीझन 24 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिल्यांदाच रात्रीची शर्यत ही चेन्नईच्या स्ट्रीट रेसिंग सर्किटमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी राऊंड 2 चा भाग म्हणून आयोजित केली आहे.

भारतातील एक प्रमुख मोटरस्पोर्टस म्हणजे इंडियन रेसिंग फेस्टिवल. आता याचा तिसरा सीजन लवकरच येणार आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने देखील उडी घेतली आहे. २०२४ च्या सीझनमध्ये कोलकता रॉयल टायगर्स रेसिंग या टीमचा तो मालक असणार आहेत.

ही भागीदारी भारतीय रेसिंगच्या प्रसिद्धीसाठी महत्त्वाची ठरू शकते. याची संकल्पना रेसिंग प्रमोशन प्रा. ली. (RPPL)ची असून भारतातील वाढत्या मोटरस्पोर्ट फॅन बेसला आकर्षित करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. यामध्ये इंडियन रेसिंग लीग (IRL) आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप (F4IC) अशा दोन मुख्य चॅम्पियनशिपचा समावेश आहे.

कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबाद या प्रमुख आठ शहरांवर आधारित संघांची स्पर्धा ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा रोमहर्षक असून कोलाका संघ नव्याने दाखल झाल्याने ह्या स्पर्धेची उत्सुकता अजून वाढली आहे.

Sourav Ganguly Racing Team
Sourav Ganguly : 'आता मला कोणीही शिव्या देत नाही, मीच रोहितला...' सौरव गांगुलीचे धक्कादायक वक्तव्य

कोलकाता रॉयल टायगर्स ही सौरव गांगुलीच्या मालकीची टीम असल्याने पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतात मोटर रेसिंगला अधिक उत्साह आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल, असे अंदाज आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आरपीपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अखिलेश रेड्डी म्हणाले, "सौरव गांगुलीची कोलकाता फ्रँचायझीचे मालक म्हणून घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. "

"त्याचे नेतृत्व आणि वचनबद्धता, तसेच त्यांचे क्रिकेटमधील यश हे भारतीयांच्या मनात घर करून राहिले आहे. म्हणूनच गांगुलीचा प्रभाव संपूर्ण भारतातील मोटरस्पोर्ट प्रेमींच्या नवीन पिढीला प्रेरणा देईल, त्यांच्यामध्ये जोश प्रज्वलित करेल आणि तरुण खेळाडूंना महानतेकडे नेईल."

"त्यांच्या सहवासामुळे प्रेक्षकांमध्ये या खेळाविषयी जागरूकता वाढेल आणि भारतातील प्रमुख मोटरस्पोर्ट इव्हेंट म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे."

भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या गांगुलीने ११३ पेक्षा जास्त कसोटी सामने आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

गांगुली म्हणाला, "कोलकाता संघासोबत या प्रवासाला सुरुवात करताना मी खरोखरच उत्साही आहे. मोटरस्पोर्ट्स हा नेहमीच माझा आवडीचा विषय आहे. ही संधी केवळ मला मोटारस्पोर्टसाठी काम करण्याची संधी देत नाही तर त्यातील संस्कृती आणि खेलाडूवृत्ती देखील अनुभवायला संधी देत आहे. टीमसोबत आम्हाला तरूणाईंमध्ये देखील या खेळासाठी प्रेरित करायचे आहे."

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.