WTC Point Table: वेस्ट इंडिजच्या पराभवाचं पाकिस्तानला दुःख! भारताला टक्कर देण्याचं स्वप्न राहू शकतं अपूर्ण

West Indies vs South Africa : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर ४० धावांनी विजय मिळवला आणि त्याचे दुःख पाकिस्तानला झाले.
WTC 2023-25 Standings
WTC 2023-25 Standings esakal
Updated on

WTC 2023-25 Standings : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील चुरस वाढतेय. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सध्या WTC मध्ये आघाडीवर आहेत, परंतु अन्य संघ त्यांना टक्कर देण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या स्पर्धेतील प्रत्येक निकाल हा एकमेकांना धक्का देणारा ठरतोय. त्यामुळेच काल वेस्ट इंडिजच्या पराभवाचा धक्का पाकिस्तानला बसला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे आणि सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवण्याचे त्यांचे ध्येय आहे. पण, काल दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० असा विजय मिळवला. या विजयानंतर WTC गुणतालिकेत बदल झाला आणि पाकिस्तानचा संघ खाली घसरला.

WTC 2023-25 Standings
३ दिवसांत ४० विकेट्स! दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांमध्ये टशन; एकाने टिपले ९ बळी

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाहुण्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिका १-० अशी जिंकली. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी २६३ धावांची गरज होती, पण त्यांना २२२ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन स्थान वर झेप घेताना पाचवे स्थान पटकावले.

SAvsWI2ndTest
SAvsWI2ndTestesakal

भारतीय संघ ६८.५२ टक्के विजयासह पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया ( ६२.५०) दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी ५० टक्क्यांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. आफ्रिका आता ३८.८९ विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तान ३६.६६ टक्केवारीसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंड ( ३६.५४), बांगलादेश ( २५.००) आणि वेस्ट इंडिज ( १८.५२) हे अनुक्रमे सातव्या, आठव्या व नवव्या क्रमांकावर आहेत.

बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पाकिस्तानला २१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत विजय मिळवून गुणतालिकेत पुन्हा आगेकूच करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.