6,6,6,6,6,6! भारताच्या युवा Priyansh Arya ची Yuvraj Singh च्या विक्रमाशी बरोबरी, Video

DPL 2024 : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दक्षिण दिल्लीचा सुपरस्टार फलंदाज प्रियांश आर्यने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले आहेत
Priyansh arya
Priyansh aryaesakal
Updated on

DPL 2024 : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दक्षिण दिल्लीचा सुपरस्टार फलंदाज प्रियांश आर्यने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी त्याने ही कामगिरी केली. दक्षिण दिल्लीचा सुपरस्टार प्रियांश आर्यने उत्तर दिल्लीच्या मनन भारद्वाजविरुद्ध एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकले आहेत.

युवराज सिंगने २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता. प्रियांशच्या फटकेबाजीने आज युवीची आठवण झाली. प्रियांश आर्यने युवराज सिंगप्रमाणेच आक्रमक फलंदाजी केली. प्रियांशने सामन्याच्या १२व्या षटकात मनन भारद्वाजविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. प्रियांशने ओव्हरचा पहिला चेंडू लाँग ऑफच्या दिशेने सीमापार पाठवला. दुसऱ्या चेंडूवर त्याने गुडघ्यावर बसून डीप मिड-विकेटवर षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर लाँग-ऑन आणि पुढच्या तीन चेंडूंवर सलग षटकार खेचले. प्रियांशने DPL ध्ये इतिहास रचला आणि एका षटकात सहा षटकार मारणारा रवी शास्त्री आणि युवराज सिंग यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला.

प्रियांशने ५० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांच्या मदतीने १२० धावांची वादळी खेळी केली. आयुष बदोनीनेही या सामन्यात ५५ चेंडूंत ८ चौकार व १९ षटकारांच्या मदतीने १६५ धावा चोपल्या आणि संघाला २० षटकांत ५ बाद ३०८ धावांपर्यंत पोहोचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.