Australia vs Scotland: ऑस्ट्रेलिया संघ ४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी स्कॉटलंडला पोहचला आहे. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी स्कॉटलंडमध्ये गेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.
स्कॉटलंड दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे स्वागत पारंपारिक स्कॉटिश पद्धतीने करण्यात आले, ज्याचा व्हिडिओ देखील स्कॉटलंड क्रिकेटच्या ऑफिशिअल सोशल मीडिया हॅन्डलवरून पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये अनोखे स्वागत पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळत आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड संघातील ट्वेंटी-२० मालिका ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंड दरम्यानची ही पहिली ट्वेंटी-२० मालिका असणार आहे. याआधी २०१३ साली या दोन देशांदरम्यान एक एकदिवसीय सामना झाला होता आणि हा सामना ऑस्ट्रेलियाने २०० धावांनी जिंकला होता. त्या सामन्यामध्ये शॉन मार्शने १५१ धावांची शतकी खेळी खेळली होती, तर मिचेल जॉन्सनने १० षटकांमध्ये केवळ ३६ धावा देऊन ४ विकेट्स घेतले होते.
रिचर्ड बेरिंगटन (कर्णधार), चार्ली कॅसल, मॅथ्यु क्रॉस (विकेटकीपर), ब्रॅड करी, जास्पर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्हस्, ओली हेअर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुनसे, सफायान शरीफ, ख्रिस सोल, चार्ली टीअर (विकेटकीपर), मार्क वॅट, ब्रॅड व्हेल.
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरॉन ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), रिले मेरेडिथ, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा.
४ सप्टेंबर - पहिला सामना
६ सप्टेंबर - दुसरा सामना
७ सप्टेंबर - तिसरा सामना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.