Sports Bulletin 7th October 2024: टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ते जिम्नॅस्ट क्विन दीपा कर्माकरची निवृत्ती

Sports News on 7th October 2024: भारतीय क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० मालिकेची विजयाने सुरवात करताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला ते जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकरच्या अचानक निवृत्तीने क्रीडा चाहत्यांना धक्का दिला.
sportsbulletinbanner
sportsbulletinbanneresakal
Updated on

IND vs BAN T20I Dipa Karmakar Retirement : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विजयाने सुरुवात करताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्याचसोबत कॅरेबियन प्रीमिअऱ लीगमध्ये प्रीती झिंटाच्या संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आणि भारताची स्टार जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकरने अचानक घेतलेली निवृत्ती... आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

India vs Bangladesh 1st T20I: भारतीय संघाने ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील आपला दबदबा कायम राखताना बांगलादेशला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स राखून नमवले. भारताने तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.  सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

sportsbulletinbanner
IND vs BAN: मयंक, नितीशच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे IPL फ्रँचायझींच्या खिशाला पडणार खड्डा; कसा ते जाणून घ्या
sportsbulletinbanner
IND vs BAN: मयंक यादवने आपलं नाणं खणखणीत वाजवलं! पदार्पणाच्या T20I सामन्यातच केली १८ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी

ऑगस्टमध्ये श्रीलंकेने वन-डे मालिकेत भारताला २-० ने पराभूत केले. भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच वन-डे मालिका होती आणि या मालिकेत श्रीलंकेने भारताला पराभवाची धूळ चारली. मागील काही महिन्यातील श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रभारी प्रशिक्षक सनथ जयसूर्याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

Deepa Karmakar
Deepa Karmakaresakal
sportsbulletinbanner
भारताला जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या Dipa Karmakar ची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

भारतीय संघाच्या कानपूर कसोटीतील आक्रमक खेळीचे श्रेय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला श्रेय दिले. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांच्या मते याचे श्रेय फक्त गंभीरचे नाही, तर कर्णधार रोहित शर्माचे आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

PAK vs ENG : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि येथील सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री उशीरा कराची आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक मोठा स्फोट झाला असून यात जीवतहानीही झाली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

sportsbulletinbanner
PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी खेळाडूंची काय ही दशा! १९७१ नंतर इंग्लंडविरुद्ध कसोटीत करता आला नव्हता ‘हा’ पराक्रम, पण आज...
sportsbulletinbanner
CPL 2024: प्रीती झिंटाच्या संघाची विजेतेपदाची प्रतीक्षा संपली, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात ठरले चॅम्पियन

On This Day in Cricket 7th October: भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाजांबद्दल जेव्हाही चर्चा होईल, तेव्हा एक नाव हमखास घेतलं जाईल, ते म्हणजे झहीर खान. ७ ऑक्टोबर १९७८ रोजी अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये जन्मलेला झहीर खानने क्रिकेट खेळण्याच्या जिद्दीनं अनेक चढ-उतार सहज पार करत त्याची वेगळी ओळख निर्माण केली. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.