SL vs IND: भारताविरुद्धच्या मालिकांपूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का, कर्णधारानेच दिला राजीनामा

Wanindu Hasarnga resign from Captaincy: भारताविरुद्धच्या मालिकांपूर्वीच श्रीलंकेच्या कर्णधाराने आपल्या पदाचा राजीमाना दिला आहे.
Sri Lanka
Sri LankaeSakal
Updated on

Wanindu Hasarnga News: भारत-श्रीलंका यांच्यामधील आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. उभय देशांमधील ही मालिका श्रीलंकेत पार पडणार आहे.

दोन देशांमध्ये तीन टी-२० सामन्यांची व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून २६ जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मात्र त्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

हसरंगाची कर्णधारपदावरून माघार

भारताविरुद्ध मालिकेच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेला एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याने श्रीलंकेच्या टी-२० संघाच्या नेतृत्वपदावरून माघार घेतली आहे. टी-२० विश्‍वकरंडकात सुमार कामगिरी केल्यामुळे हसरंगा याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र खेळाडू म्हणून तो संघात कायम राहणार आहे.

Sri Lanka
Gautam Gambhir: 'मी आधीच्या सपोर्ट स्टाफचे...', भारतीय संघाचा हेड कोच झाल्यानंतर गंभीर द्रविडबद्दल काय म्हणाला?

मालिकांचे वेळापत्रक

भारत-श्रीलंका यांच्यामध्ये २६ जुलैपासून टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. २६, २७ व २९ जुलै यादरम्यान तीन टी-२० लढती पार पडतील, तसेच १ ऑगस्टपासून दोन देशांमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. १, ४ व ७ ऑगस्ट यादरम्यान एकदिवसीय लढती खेळवण्यात येतील. टी-२० लढती पाल्लेकेले व एकदिवसीय लढती कोलंबोमध्ये होणार आहेत.

टी-२० मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामने सुरू होतील)

  • पहिला सामना - २६ जुलै.

  • दुसरा सामना - २७ जुलै

  • तिसरा सामना - २९ जुलै

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामने सुरू होतील.)

  • पहिला सामना - १ ऑगस्ट

  • दुसरा सामना - ४ ऑगस्ट

  • तिसरा सामना - ७ ऑगस्ट

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com