Chamari Athapaththu Record: श्रीलंकेत सध्या महिला आशिया कप टी२० स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंका संघाची कर्णधार चामरी अटापट्टूने एक इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सोमवारी श्रीलंका आणि मलेशिया महिला संघात सामना झाला. हा सामना श्रीलंकेने १४४ धावांनी जिंकला.
या सामन्यात अट्टापट्टूने ६९ चेंडूत १४ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली. त्यामुळे ती महिला टी२० आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
या शतकाहसह तिने महिला टी२० आशिया कप स्पर्धेत सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा मिताली राजचा विक्रम मोडला आहे. मितालीने क्वालालंपुर येथे २०१८ मध्ये मलेशियाविरुद्धच झालेल्या सामन्यात नाबाद ९७ धावांची खेळी केली होती.
इतकेच नाही, महिला टी२० आशिया कप स्पर्धेत तर एकाच डावात सर्वाधिक बाऊंड्री (चौकार आणि षटकार मिळून) मारण्याचा विक्रमही तिच्या नावावर झाला आहे.
सर्वाधिक शतके
अट्टापट्टूचे हे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. त्यामुळे आता ती महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत युएईच्या ईशा ओझासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.
दरम्यान, सोमवारी अट्टापट्टूच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त अनुष्का संजीवनीने ३१ आणि हर्षिता समरविक्रमाने २६ धावा केल्या. मलेशियाकडून विनफ्रेड दुरईसिंगमने २ विकेट्स घेतल्या.
१८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशिया संघ १९.५ षटकात अवध्या ४० धावांवरच सर्वबाद झाला. मलेशियाकडून केवळ एल्सा हंटरने दोन आकडी धावा केल्या. तिने १० धावा केल्या. श्रीलंकेकडून शशिनी गिम्हानीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.