SL vs NZ, 2nd Test: श्रीलंकेचा मोठा उलटफेर! न्यूझीलंडला डावाने हरवत कसोटी मालिकेतही दिला व्हाईटवॉश

Sri Lanka won Test Series Against New Zealand by 2-0: श्रीलंका क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात डावेने विजय मिळवला. याबरोबरच कसोटी मालिकेत व्हाईटवॉशही दिला.
Sri Lanka Cricket Team
Sri Lanka Cricket TeamSakal
Updated on

Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Match: श्रीलंका क्रिकेट संघाने मोठा उलटफेर केला आहे. बलाढ्य न्यूझीलंड संघाला कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी (२९ सप्टेंबर) एक डाव आणि १५४ धावांनी पराभूत केलं.

यासह श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशा फरकाने जिंकत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. श्रीलंकेच्या या विजयात गोलंदाज प्रभात जयसूर्या आणि निशान पेरिस यांनी मोलाचे योगदान दिल. त्यांनी या सामन्यात प्रत्येकी ९ विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेने हा निर्णय योग्य ठरवत अफलातून फलंदाजी केली. श्रीलंकेने पहिला डाव १६३.४ षटकात ५ बाद ६०२ धावांचा डोंगर उभारल्यानंतर घोषित केला.

Sri Lanka Cricket Team
SL vs NZ 2nd Test : Kane Williamson सह न्यूझीलंडचे ३ फलंदाज ४ तासांत दोनवेळा OUT झाले, नेमकं काय घडलं ते वाचा

श्रीलंकेकडून पहिल्या डावात कामिंडू मेंडिसने २५० चेंडूत नाबाद १८२ धावांनी सर्वोत्तम खेळी केली. या खेळीत त्याने १६ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त दिनेश चंडिमल आणि कुशल मेंडिस यांनीही शतके केली.

चंडिमलने २०८ चेंडूत ११६ धावांची खेळी केली, तर कुशल मेंडिसने १४९ चेंडूत १०६ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच कर्णधार टीम साऊदीने १ विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला श्रीलंकन गोलंदाजांनी चांगलाच संघर्ष करायला लावला. प्रभात जयसूर्या आणि निशान पेरिस यांच्यासमोर न्यूझीलंड फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. न्यूझीलंडचा पहिला डाव ३९.५ षटकात अवघ्या ८८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे श्रीलंकेला तब्बल ५१४ धावांची आघाडी मिळाली.

न्यूझीलंडकडून पहिल्या डावात सर्वाधिक धावा मिचेल सँटेनरने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. तसेच रचिन रविंद्रने १० धावा आणि डॅरिल मिचेलने १३ धावा केल्या. याशिवाय कोणालाही १० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या, तर पेरिसने ३ विकेट्स घेतल्या. तसेच असिथा फर्नांडोने १ विकेट घेतली.

Sri Lanka Cricket Team
Kamindu Mendis ने मोडला कांबळीचा २० वर्षे जुना विक्रम! 'असा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई, तर ब्रॅडमन यांच्याशीही बरोबरी

श्रीलंकने मोठी आघाडी मिळवल्याने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. त्यामुळे न्यूझीलंडला लगेचच फलंदाजीला उतरावे लागले. न्यूझीलंडने पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. मात्र तरी त्यांचा दुसरा डाव ८१.४ षटकात ३६० धावांवर संपला. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून ग्लेन फिलिप्सने ९९ चेंडूत सर्वोच्च ७८ धावांची खेळी केली. तसेच मिचेल सँटेनरने अखेरीस ११५ चेंडूत ६७ धावा करत चांगली झुंज दिली. याशिवाय डेवॉन कॉनवेने ६२ चेंडूत ६१ धावांची खेळी केली, तर टॉम बंडेलनेही अर्धशतक करताना ६४ चेंडूत ६० धावा केल्या. केन विलियम्सनेही ४६ धावांचे योगदान दिले.

दुसऱ्या डावात निशान पेरिसने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या, तर प्रभात जयसूर्याने ३ विकेट्स घेतल्या. कर्णधार धनंजय डी सिल्वाने १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.