Car Accident : माजी कर्णधाराचा भीषण अपघात, आलिशान गाडीचा झाला चुराडा अन्...

Sri Lanka Former Captain lahiru thirimanne Car Accident : श्रीलंकेचा टी20 वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या लाहिरू थिरिमानेच्या गाडीला झाला भीषण अपघात
lahiru thirimanne
lahiru thirimanneesakal
Updated on

Sri Lanka Former Captain lahiru thirimanne Car Accident : श्रीलंकेचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमानेचा श्रीलंका येथील अनुराधापूर शहराजवळ भीषण अपघात झाला. आज सकाळी झालेल्या या अपघातात थिरिमाने हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची आलिशान गाडी ही मिनी ट्रकला धडकली. या अपघातात थिरिमानेच्या गाडीचा चुराडा झाला आहे.

थिरिमाने सोबत या गाडीत अजून तीनजण प्रवास करत होते. या सर्वांना अनुराधापूर टिचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. थिरिमानेची दुखापत किती गंभीर आहे हे अजून समजू शकलेलं नाही. मात्र त्याची प्रकृती स्थीर आहे. ही घटना सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी झाली होती.

lahiru thirimanne
Ranji Trophy 2024 Winner : रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधी रूपयांचा वर्षाव; विदर्भला देखील मिळार 'इतके' कोटी रूपये

धार्मिक स्थाला भेट देण्यासाठी जा होता थिरिमाने

मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी लाहिरू थिरिमानेच्या गाडीला अपघात झाला त्यावेळी तो कुटुंबातील सदस्यांसह एका धार्मिक स्थाळाला भेट देण्यासाठी जात होता. थिरिमानेने 2010 मध्ये श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्याने श्रीलंकेकडून 44 कसोटी सामने खेळले आहेत. तर 127 वनडे आणि 26 टी 20 सामन्यांसाठी श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केलं आहे.

कसोटीत थिरिमानेने 2088 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 3194 धावा केल्या आहेत. तर टी 20 मधये त्याच्या 291 धावा झाल्या आहेत. त्याने 2014 मध्ये श्रीलंकेच्या टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य होता. याचबरोबर त्याने तीन टी 20 वर्ल्डकप आणि दोन वनडे वर्ल्डकपमध्ये देखील श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केलं आहे.

lahiru thirimanne
Ranji Trophy 2024 Rohit Sharma : मुंबईचा योद्धा... मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकताच रोहितची खास पोस्ट

भारताविरूद्ध खेळला होता शेवटचा सामना

लाहिरू थिरिमानेने 5 वनडे सामन्यात श्रीलंकेचे कर्णधारपद देखील भूषवले होते. त्याने 12 मार्च 2022 मध्ये श्रीलंकेसाठी शेवटाचा सामना खेळला होता. त्याने 2023 मध्ये 13 वर्षाची क्रिकेट कारकीर्द संपवली होती. शेवटचा सामना त्याने बंगळुरू येथे भारताविरूद्ध खेळला होता. या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात 8 तर दुसऱ्या डावात 0 धावा केल्या आहेत.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.