Sri Lanka vs New Zealand six day test: मॉर्डन क्रिकेटमध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅट सर्वांच्या आवडीचा झाला आहे. कमी वेळेत जास्त मनोरंजन अशी ट्वेंटी-२० क्रिकेटने ओळख तयार केली आहे. पण, यातही कसोटी क्रिकेट आपलं मुळ मजबूत करून उभं आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी गेला आहे, तर पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातही कसोटी सुरू आहे. अशात श्रीलंका क्रिकेट चर्चेत आलं आहे. श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत सहा दिवसांची कसोटी मॅच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी एक दिवसाची विश्रांती ठेवली गेली आणि त्यामुळे बऱ्याच वर्षांनी सहा दिवसांची कसोटी पाहायला मिळू शकते. १८ सप्टेंबरपासून श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यात पहिली कसोटी मॅच गॅल्ले येथे होणार आहे. या कसोटीत एका दिवसांची विश्रांती ठेवली गेली आहे.
डेमोक्रॅटिक सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणूक हे २१ सप्टेंबरला विश्रांतीचा दिवस ठरवण्याचं मुख्य कारण आहे. ८० ते ९० च्या दशकात सहा दिवसांची कसोटी खूप लोकप्रिय होती. त्याकाळी, रविवारी कसोटी सामना न घेण्याची परंपरा होती, ही प्रथा अखेरीस बदलली.
२००८ मध्ये श्रीलंकेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता आणि त्यांच्यातल्या पहिल्या कसोटीत एक दिवसाची विश्रांती होती. निवडणुकीमुळे ही विश्रांती घेतली गेली होती आणि त्यामुळे सहा दिवसांची कसोटी झाली होती. २६ ते ३१ डिसेंबर असा हा सामना रंगला होता आणि २९ डिसेंबर विश्रांतीचा दिवस होता.
या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात २९३ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशला १७३ धावा करता आल्या, परंतु त्यांनी दुसऱ्या डावात जोरदार प्रत्युत्तर दिले. ५२१ धावांचा पाठलाग करताना त्यांनी ४१३ धावा कुटल्या होत्या. २००१ मध्येही श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना Poya Day मुळे सहा दिवसांचा झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.