Sunil Gavaskar Dattajirao Gaekwad : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदनावर उतरला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अचानक भारतीय संघ काळ्या फिती बांधून का मैदानात उतरला याबाबत चर्चा सुरू झाली होती. भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे 13 फेब्रुवारीला वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले होते. ते 12 दिवस रूग्णालयात दाखल होते.
दत्ताजीराव गायकवाड यांनी भारताकडून 1951 ते 1962 या काळात 11 कसोटी सामने खेळले होते. दरम्यान, बीसीसीआयने तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक वक्तव्य प्रसिद्ध केलं. त्यात बीसीसीआय म्हणते की, 'भारतीय संघ दत्ताजीराव गायकवाड यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय संघ आज दंडावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरले. त्याचे नुकतेच निधन झाले आहे.'
दत्ताजीराव गायकवाड हे उजव्या हाताचे फलंदाज होते. याचबरोबर ते मध्यमगती गोलंदाजी आणि लेग स्पिन देखील टाकत होते. त्यांना 1959 च्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केलं होतं.
दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काळी फित बांधण्याच्या निर्णयावर टीका केली.
गावसकर समालोचन करताना म्हणाले की, 'नसण्यापेक्षा उशीरा का असेना हे झालं. भारतीय संघाने पहिल्या दिवसापासूनच काळ्या फिती घालून सामना खेळायला हवा होता. त्यांनी भारतीय संघाचे पाच सामन्यांच्या मालिकेत नेतृत्व केलं होतं. त्यातील चार सामन्यात त्यांनी संघाचं नेतृत्व केलं होतं. एका कसोटीत पंकज रॉय यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.'
दत्ताजीराव गायकवाड यांनी भारताकडून 11 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले. ते बडोदाकडून खेळायचे. त्यांचे बडोद्यातच वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. ते भारताचे जिवंत असलेले सर्वात वयस्कर क्रिकेटपूट होते.
त्यांनी 70,80 आणि 90 च्या दशकात बडोद्याच्या अनेक क्रिकेटपूटंना मार्गदर्शन केलं. यात नयन मोंगिया सारख्या खेळाडूंचा देखील समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.