Sunil Gavaskar on Prithvi Shaw Cricket Fitness: मुंबईचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ हा गेल्या काही काळापासून मुंबई आणि भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अपयशी ठरताना दिसत आहे. त्याला रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठीही मुंबई संघात स्थान देण्यात आले नव्हते.
यामागे त्याचा फिटनेस आणि त्याचा बेशिस्तपणा असं कारण असल्याचे समोर आले होते. मात्र आता खुद्द सुनील गावसकर यांनी पृथ्वी शॉ याला पाठिंबा दिला आहे.
काही मिडिया रिपोर्ट्सनुसार २४ वर्षीय पृथ्वी शॉ संघाच्या ट्रेनिंगसाठीही नियमितपणे येत नसल्याचे समजत आहे. तसेच त्याचे वजनही वाढले आहे.