जर Joe Root ने सचिनचा विक्रम मोडला, तर असा काय फरक पडणारे? गावसकरांचा माजी कर्णधाराला थेट सवाल

Sunil Gavaskar hit back at Michael Vaughan: जो रुट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो, यावर इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने कमेंट केली होती, त्यावर आता सुनील गावसकरांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
Sunil Gavaskar - Michael Vaughan | Joe Root
Sunil Gavaskar - Michael Vaughan | Joe RootSakal
Updated on

Sunil Gavaskar hit back at Michael Vaughan: जो रुट सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शानदार खेळ केला. त्याने ६ डावात ७५ च्या सराररीने ३७५ धावा ठोकल्या.

यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही त्याने सध्या सहावा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या १४६ कसोटीत १२४०२ धावा झाल्या आहेत.

सध्या रुट ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे तो सचिन तेंडुलकरचा कसोटीतील सर्वाधिक १५९२१ धावांचा विक्रम मोडू शकतो अशी चर्चा आहे. याबाबतच इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी कमेंट केली होती. त्यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वॉनने एका पॉडकास्टमध्ये गमतीने म्हटले होते की जर रुटने सचिनचा विक्रम मोडला, तर कसोटी क्रिकेटसाठी हे चांगलेच असेल. तसेच वॉनने बीसीसीयवरही निशाणा साधत म्हटले होते की बीसीसीआय हा विक्रम न मोडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. कारण यानंतर दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला त्या विक्रमापर्यंत पोहचण्यासाठी सर्वकाही द्यावं लागेल.

Sunil Gavaskar - Michael Vaughan | Joe Root
Sunil Gavaskar Birthday: "..आणि वेस्ट इंडिजमधील अधिकाऱ्याने गावसकर यांची मागितली माफी!" पंचाहत्तरीतील ‘लिटल मास्टर’
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.