IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाला घरात घुसून पुन्हा हरवणार अन् भारत मालिका 'या' फरकानं जिंकणार, गावसकरांचा दावा

Sunil Gavaskar on India vs Australia Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघ कशा फरकाने विजय मिळवेल, याबाबत सुनील गावसकरांनी भविष्यवाणी केली आहे.
India vs Australia Test Series | Sunil Gavaskar
India vs Australia Test Series | Sunil GavaskarSakal
Updated on

Border-Gavaskar Trophy 2024-25: भारतीय क्रिकेट संघ २०२४ च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेचे वेळापत्रकही काही दिवसांपूर्वीच समोर आले आहे.

याबाबत अनेक आजी-माजी खेळाडूंनी आपापली मतं मांडली आहेत. आता या मालिकेला नाव देण्यात आलेल्या दोन दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणजे सुनील गावसकर यांनीही त्यांचे मत मांडले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. तसेच २०१४-१५ नंतर भारताने कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळेच यांच्याच्या मालिकेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या मालिकेत आता यावेळीही भारताचेच ३-१ असे वर्चस्व राहिल, असं मत गावसकर यांनी मांडले आहे.

India vs Australia Test Series | Sunil Gavaskar
IND vs AUS: रिकी पाँटिंगच्या ३-१ अशा दाव्याची Ravi Shastri यांनी काढली हवा; म्हणाले, पुन्हा घरात घुसून...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.