Sunil Gavaskar: टीम इंडियाच्या आक्रमकतेचं क्रेडिट रोहितचंच; गौतमला श्रेय देणाऱ्यांना सुनील गावसकर म्हणाले, 'तळवे चाटणारे'

Sunil Gavaskar said Rohit Sharma Deserves Credit for India Batting Transformation: बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीत भारतीय संघाने फलंदाजी करताना आक्रमक पवित्रा स्विकारला होता. याबाबत अनेकांनी विविध मतं मांडली होती. आता याच कसोटीबाबत बोलताना गावसकरांनी मोठं विधान केले आहे.
Rohit Sharma | Sunil Gavaskar | Gautam Gambhir
Rohit Sharma | Sunil Gavaskar | Gautam GambhirSakal
Updated on

Sunil Gavaskar Statement on Rohit Sharma: बांगलादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका पूर्ण झाली आहे. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तर निकाल लागेल की नाही, याची पावसामुळे शाश्वती नसतानाही भारताने अविश्वसनीय खेळ करत विजय संपादन केला होता.

अडीच दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही भारताने आक्रमक फलंदाजी करत या सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर भारताच्या अशा फलंदाजीबद्दल चर्चेला सुरुवात झाली. खरंतर इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने जबाबदारी सांभाळल्यापासून त्यांचा संघ कसोटीत आक्रमक खेळताना दिसतो. त्यामुळे त्याला बॅझबॉल म्हणूनही ओळखले जाते.

भारतानेही काहीसा तशाच पवित्रा कानपूरला झालेल्या दुसऱ्या कसोटीत स्विकारला होता. दरम्यान, भारतीय संघाच्या या भूमिकेबद्दल अनेकांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला श्रेय दिले. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांच्या मते याचे श्रेय फक्त गंभीरचे नाही, तर कर्णधार रोहित शर्माचे आहे.

Rohit Sharma | Sunil Gavaskar | Gautam Gambhir
IND vs BAN: १८ वी कसोटी मालिका अन् १८० व्या सामन्यात विजय! टीम इंडियासाठी कानपूर सामना ठरला विक्रमी

कानपूरला झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला. ३५ षटकात बांगलादेशने पहिल्या डावात ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे पुढचे दोन दिवस वाया गेले होते. पण चौथ्या दिवशी भारताने बांगलागेशचा पहिला डाव २३३ धावांवर संपवला.

त्यानंतर भारताने पहिल्या डावात वादळी फलंदाजी करताना पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला आणि ५२ धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांवरच संपवला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी ९५ धावांचेच लक्ष्य होते. हे लक्ष्य भारताने अवघ्या १७.२ षटकात पार केले होते.

या सामन्यातील भारताने फलंदाजीबाबत गावसकरांनी स्पोर्टस्टारच्या स्तंभात लिहिले की 'एका वृत्तापत्राने लिहिले भारताची फलंदाजी बॉसबॉल होती. कारण कर्णधार म्हणजे संघाचा बॉस रोहितने हा मार्ग संघाला दाखवला होता. पण काही जुने लोक त्याला गौतम गंभीरमुळे गमबॉल म्हणत आहेत.'

Rohit Sharma | Sunil Gavaskar | Gautam Gambhir
IND vs BAN: ‘१०० वर बाद होण्याची जोखीम स्वीकारणार होतो’, रोहितने सांगितला दुसऱ्या कसोटीतील प्लॅन

गावसकर पुढे म्हणाले, 'इंग्लंडने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक मॅक्युलमच्या कार्यकाळात फलंदाजीची भूमिका बदलली आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की रोहितही गेल्या काही वर्षांपासून तशी फलंदाजी करत आहे आणि संघालाही आक्रमक खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.'

'गंभीरला प्रशिक्षकाची जबाबदारी घेऊन दोन-तीन महिनेच झाले आहेत. त्यामुळे त्याला श्रेय देणे म्हणजे उच्च दर्जाचे पाय चाटणे, असं म्हणता येईल. ज्याप्रकारे मॅक्युलम फलंदाजी करायचा, त्याप्रकारे गंभीरने क्वचितच फलंदाजी केली असेल. त्यामुळे जर श्रेय द्यायचेच असेल, तर ते फक्त रोहितला द्यायला हवे बाकी कोणालाही नाही.'

याशिवाय भारतीय फलंदाजांनी निर्भीडपणे खेळण्याच्या भूमिकेसाठी गोहित असं नाव देता येऊ शकतं असंही गावसकरांनी सुचवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.