Virat Kohli-Rohit Sharma: विराट कोहली, रोहित शर्मा यांनी दुलीप ट्रॉफीत खेळायला हवे होते- सुरेश रैना

Test Cricket: रोहितने मार्चपासून एकही कसोटी किंवा प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही तर विराट कोहलीने जानेवारीत शेवटचा कसोटी खेळला आहे.
Virat Kohli-Rohit Sharma
Virat Kohli-Rohit Sharmaesakal
Updated on

Virat Kohli Rohit Sharma Duleep Trophy: आगामी दुलीप ट्रॉफीमधून विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यावरून मतमतांतरे आहेत. माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी आकडेवारी मांडून या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिल्यावरून BCCI ला जाब विचारला होता. त्यात आता माजी खेळाडू सुरेश रैना यानेही मत व्यक्त केले आहे. केएल राहुल, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत हे सर्व दुलीप ट्रॉफी टूर्नामेंट खेळत आहेत. बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड मालिका लक्षात घेता रोहित व विराट यांनीही दुलीप ट्रॉफीत खेळायला हवं होतं असं रैनाला वाटते.

रैना म्हणाला, “ रोहित आणि विराट यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळायला हवे होते. आयपीएल संपल्यापासून ते कसोटी क्रिकेट खेळले नाही. आगामी काळात महत्त्वपूर्ण कसोटी मालिका असल्याने त्यांनी ४ दिवसीय क्रिकेट खेळले पाहिजे होते. चौथ्या दिवशी विकेट कशी फिरते याचा सराव त्यांना करता आला असता."

Virat Kohli-Rohit Sharma
T20 World Cup 2024: सूर्याची दहशत! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला दुसऱ्याने घेतलेल्या कॅचमध्येही दिसतोय आपला यादव

रोहित-कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळायला हवे होते, असे मत रैनासोबतच भारताच्या दोन दिग्गज संजय मांजरेकर आणि सुनील गावस्कर यांनीही व्यक्त केले आहे. गावस्कर यांना वाटते की, ते सरावाशिवाय पुढील कसोटी सामन्यांसाठी मैदानात उतरतील, तर मांजरेकरांना वाटते की त्यांना आधीच चांगली विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती.

कोहली-रोहित का खेळत नाहीत?

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना विचारले असता त्यांनी म्हटले होते की, कोहली आणि रोहित यांच्यावरील भार वाढल्याने दुखापत होण्याची शक्यता आहे. दोन मायदेशी कसोटी मालिका (बांगलादेश आणि न्यूझीलंड) आणि एक ऑस्ट्रेलिया दौरा विशेषत: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी येत असल्याने या प्रमुख खेळाडूंना बाहेर बसावे लागण्याचा धोका आम्हाला पत्करायचा नाही.

Virat Kohli-Rohit Sharma
IPL: तुम्ही सामान्यांकडून शुल्क घेता, पण बीसीसीआयला सूट का देता? हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं

दुलीप ट्रॉफीचे वेळापत्रक

५ ते ८ सप्टेंबर, संघ-अ विरुद्ध संघ-ब, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू, 9:30

५ ते ८ सप्टेंबर, संघ-क विरुद्ध संघ-ड, आरडीटी स्टेडियम अ , अनंतपूर, 9:30

१२ ते १५ सप्टेंबर, संघ-अ विरुद्ध संघ-ड, आरडीटी स्टेडियम अ, अनंतपूर, 9:30

१२ ते १५ सप्टेंबर, संघ-ब विरुद्ध संघ-क, आरडीटी स्टेडियम ब , अनंतपूर 9:30

१९ ते २२ सप्टेंबर, संघ-ब विरुद्ध संघ- ड, आरडीटी स्टेडियम ब , अनंतपूर, 9:30

१९ ते २२ सप्टेंबर, संघ-अ विरुद्ध संघ-क, आरडीटी स्टेडियम अ , अनंतपूर 9:30

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.