IND vs BAN: सुर्याच्या धमाकेदार फलंदाजीने इतिहास रचला; Virat Kohli नंतर ठरला दुसरा भारतीय खेळाडू

IND vs BAN : बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने १३३ धावांनी विजय मिळवला आणि ३-० ने मालिका जिंकली.
suryakumar yadav
suryakumar yadavesakal
Updated on

Suryakumar Yadav: बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव व संजू सॅमसनने विक्रमी भागीदारी केली. ज्यामुळे टीम इंडियाने सामन्यात २९७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीसोबत सुर्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ७१व्या डावात हा विक्रम केला आहे.

भारतासाठी सर्वात जलद २५०० धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, त्याने ६८ डावात हा टप्पा गाठला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम हा सर्वात वेगवान २५०० धावा करणारा फलंदाज आहे, त्याने ६२ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर मोहम्मद रिझवानने ६५ डावात २५०० धावा पूर्ण केल्या व यादीत दुसरे स्ठान मिळवले आहे.

suryakumar yadav
Sanju Samson: 'एकाच ओव्हरमध्ये ५ षटकार मारायला माझ्या मेंटॉरने...', सॅमसन वादळी शतकानंतर झाला व्यक्त

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये जलद २५०० धावा करणारे खेळाडू

बाबर आझम – ६२ डाव

मोहम्मद रिझवान – ६५ डाव

विराट कोहली - ६८ डाव

सूर्यकुमार यादव – ७१ डाव

अ‍ॅरॉन फिंच – ७८ डाव

 मार्टिन गुप्टिल – ८३ डाव

हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने तब्बल २९७ धावा उभारल्या. सूर्यकुमार यादव व संजू सॅमसनने धमाकेदार कामगिरी केली. दोघांनी ७० चेंडूंमध्ये १७३ धावांची मोठी भागिदारी केली. संजूने ११ चौकार व ८ षटकारांसह १११ धावा करत शतक झलकावले. तर कर्णधार सूर्याकुमार यादवने जलद अर्धशतकीय खेळी केली. रियान परागने १३ चेंडूत ३३ धावा व हार्दिक पांड्याने १८ चेंडूत ४७ धावा जोडल्या.

suryakumar yadav
IND vs BAN 3rd T20I: २९७ धावा, २२ षटकार अन् २५ चौकारची बरसात! टीम इंडियाने T20I मध्ये रचले विक्रमांचे मनोरे

सर्वाधिक ट्वेंटी-२० धावांचा विक्रम

भारताने या समन्यात एकूण २९७ धावा उभारल्या आणि आणखी एक विक्रम रचला. भारत ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा संघ ठरला. नेपाळ ने याआधी मँगोलियाविरुद्ध ३१७ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.