Suryakumar Yadav : 'मला कर्णधार व्हायचं नाही तर...' टी-20 मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने केलं मोठं वक्तव्य

India vs Sri Lanka T20 Series 2024 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या T20 मालिकेत श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला आहे.
Suryakumar Yadav India vs Sri Lanka T20 Series 2024
Suryakumar Yadav India vs Sri Lanka T20 Series 2024sakal
Updated on

India vs Sri Lanka T20 Series 2024 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या T20 मालिकेत श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला आहे. मंगळवारी खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान संघाने जिंकलेला सामना हारला. सूर्यकुमार यादवने स्वतः शेवटचे षटक टाकले आणि सामना बरोबरीत सोडवला, जो भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला.

मात्र, सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधार बनण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. सूर्याने कर्णधारपद सोडण्याबाबत काहीही बोलले नाही, उलट त्याला कर्णधार नव्हे तर संघाचा लीडर व्हायचे आहे, असे तो म्हणाला आहे.

Suryakumar Yadav India vs Sri Lanka T20 Series 2024
Paris Olympic 2024 : 'या' खेळाडूच्या जिद्दीला सलाम!! सात महिन्यांची गर्भवती तलवारबाज ऑलिम्पिकमध्ये झाली सहभागी अन्...

सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादव म्हणाला की, “मला वाटतं शेवटच्या षटकांपेक्षा, जेव्हा आम्ही 30/4 आणि 48/5 च्या आसपास होतो तेव्हा पोरांनी सानमा त्यांच्यापासून दूर नेला… आणि त्या ट्रॅकवर 140 धावसंख्या ओक्के होती. जेव्हा आम्ही क्षेत्ररक्षणासाठी जात होतो, तेव्हा मी खेळाडूंना एकच म्हणालो की, 'मी असे खेळ पाहिले आहेत. त्यामुळे दीड तास मनापासून खेळलो तर जिंकू शकतो.

Suryakumar Yadav India vs Sri Lanka T20 Series 2024
SL vs IND : टी-20 मालिका संपली, आता रंगणार ODIचा थरार! जाणून घ्या वेळापत्रक अन् सर्वकाही...

सूर्या पुढे म्हणाला, "जर तुम्ही 200-220 धावा करण्यात आणि गेम जिंकण्याचा आनंद घेत असाल, तर तुम्ही 30/4 आणि 70/5 चा देखील आनंद घ्यावा कारण यामुळे तुमच्या आयुष्यात संतुलन निर्माण करते आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे जा आणि नम्र रहा. खरं सांगायचे झाले तर, त्यांच्याकडे जितके कौशल्य आहे आणि आत्मविश्वास आहे यामुळे माझे काम खूप सोपे झाले आहे. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची सकारात्मकता आणि त्यांनी दाखवलेली एकमेकांची काळजी अविश्वसनीय आहे.

Suryakumar Yadav India vs Sri Lanka T20 Series 2024
Paris Olympic 2024 Day 5: पीव्ही सिंधू, मनिका बत्रा अन् लवलिना बोर्गोहेनही उतरणार मैदानात, पाहा पाचव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक

कर्णधार या नात्याने सूर्यकुमार यादव म्हणाला की, "मागील सामन्यानंतर मी म्हणालो की काही मुले विश्रांती घेणार आहेत आणि तेव्हा ते म्हणाले की, 'ठीक आहे आम्ही विश्रांती घेऊ आणि तुम्ही इतरांना संधी देऊ शकता. यावरून संघाचे चारित्र्य आणि ते इतरांच्या कामगिरीवर किती आनंदी आहेत हे दिसून येते. त्याने माझे काम सोपे केले आहे. जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा माझ्यावर थोडे दडपण असते. मला फक्त व्यक्त होण्यात मजा येते. मी मालिकेपूर्वी सांगितले होते की, मला कर्णधार व्हायचे नाही, मला लीडर व्हायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.