IND vs BAN: टीम इंडियाचं ठरलं! अभिषेक शर्मा, संजू सॅमसन ओपनिंग करणार

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेला उद्यापासून सुरूवात हाेणार असून ग्वालियर येथे होणारा पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavesakal
Updated on

India vs Bangladesh 1st T20I : बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय संघाची सलामीजोडी जाहीर केली आहे. अभिषेक शर्मा, अभिषेकसोबत संजू सॅमसन ओपनिंग करेल असे कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले. बांगलादेशविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२० सामन्याची रणनिती ठरली असून भारतीय संघ ग्वालियरमधील दोन दिवसांच्या सरावानंतर पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशला नमवण्यासाठी सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा जोश असलेला भारतीय संघ उद्या बांगलादेशविरुद्ध मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ग्वालियरच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच होणार आहे.

ग्वालियरच्या नवीन ठिकाणी होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. दोन दिवसांच्या सरावानंतर सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-२० सामन्यासाठी येथील खेळपट्टी योग्य वाटली. “आम्ही दोन दिवस सराव केरताना विकेट्स आम्हाला संथ वाटत नाहीत. ट्वेंटी-२० सामन्यासाठी विकेट्स चांगल्या आहेत आणि येथे चांगला खेळ होईल.” सूर्यकुमार यादव म्हणाला.

हार्दिक पांड्या हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो मधल्या षटकांमध्ये तो फलंदाजी करताना पहायला मिळेल. रिंकू सिंग हा भारताच्या ट्वेंटी-२० संघातील नियमित खेळाडू आहे आणि त्याच्यावर मॅच फिनिशरची भूमिका बजावण्याची जबाबदारी असेल. वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांचे स्थान पक्के समजले जात आहे. वरुण चक्रवर्थीला पहिल्या ट्वेंटी-२०त संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तो नोव्हेंबर २०२१मध्ये भारताकडून शेवटचा खेळला होता. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्या अनुपस्थिती अर्शदीप सिंग याच्यावर जलदगती माऱ्याची जबाबदारी असेल. त्याच्यासोबतली हर्षित राणा व मयांक यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

suryakumar yadav
IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

बांगलादेश टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ:

सूर्यकुमार यादव (सी), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीप), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या , रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, टिळक वर्मा

भारत विरुद्ध बांगलादेश टी२० मालिकेचे वेळापत्रक

६ ऑक्टोबर - पहिला टी२० सामना, ग्वाल्हेर (संध्या. ७ वा.)

९ ऑक्टोबर - दुसरा टी२० सामना, दिल्ली (संध्या. ७ वा.)

१२ ऑक्टोबर - तिसरा टी२० सामना, हैदराबाद (संध्या. ७ वा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.