India Squad for Sri Lanka Tour : सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व; रोहित शर्मा, विराट कोहलीचा मोठा निर्णय

India vs Sri Lanka Squad : हार्दिक पांड्याचे कर्णधार होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले, टीम इंडियाने ट्वेंटी-२० साठी निवडला नवा कर्णधार
Suryakumar Yadav to captain India in T20Is
Suryakumar Yadav to captain India in T20Issakal
Updated on

India vs Sri Lanka Squad : श्रीलंका दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळण्याचा निर्णय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी BCCIला कळवला आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे मालिकेसाठी उपलब्ध असतील, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे. BCCI वरिष्ठ निवड समितीची गुरुवारी संध्याकाळी झूम कॉलद्वारे बैठक होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक परिषदेसाठी श्रीलंकेला रवाना झाले आहेत.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने बीसीसीआयशी सल्लामसलत करून सूर्यकुमार यादव ( Captain Suryakumar Yadav) याला तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार करण्याचा शेवटी निर्णय घेतला आहे. रोहित वन डेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने याआधी वृत्त दिले आहे.

Suryakumar Yadav to captain India in T20Is
India squad for SL Tour : रोहित शर्माने पडद्यामागून हार्दिक पांड्याचा गेम केला? गौतम गंभीरसोबत मिळून मोठा डाव टाकला

निवड समितीने बीसीसीआयला सूचित केले आहे की सूर्यकुमारची कामगिरी समाधानकारक नसल्यास आणि अपेक्षा पूर्ण न केल्यास भविष्यात कर्णधार म्हणून त्याला बदलण्यास येईल. भारत आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या २०२६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी BCCI सूर्यकुमारकडे लक्ष देत आहे.

Suryakumar Yadav to captain India in T20Is
India Squad for Sri Lanka : उत्सुकता शिगेला! भारतीय संघाची निवड होणार आज; कोणकोणत्या युवा खेळाडूंना मिळणार संधी?

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्सचा मधल्या फळीतील फलंदाज रियान परागला भारतीय मधल्या फळीसाठी पुढे केले जाऊ शकते. त्याला वन डे व ट्वेंटी-२० संघात निवडले जाण्याची शक्यता आहे. परागच्या समावेशामुळे सूर्यकुमार वन डे संघाचा भाग असणार नाही आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल देखील केवळ ट्वेंटी-२० संघात असेल. रिषभ पंतचाही दोन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी विचार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.