India Squad vs SL : पांड्याचा झाला गेम! टी-20 वर्ल्ड कप 2026पर्यंत 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा कर्णधार?, BCCIने नाव केले निश्चित

India Squad for Sri Lanka Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIने टीम इंडियाच्या पुढील टी-20 कर्णधाराचे नाव जवळपास निश्चित केले आहे.
suryakumar yadav will be the captain of Team India till T20 World Cup 2026 hardik pandya
suryakumar yadav will be the captain of Team India till T20 World Cup 2026 hardik pandyasakal
Updated on

India Squad Announcement for Sri Lanka Tour Updates : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIने टीम इंडियाच्या पुढील टी-20 कर्णधाराचे नाव जवळपास निश्चित केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवणारा खेळाडू टी-20 वर्ल्ड कप 2026 पर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल.

हार्दिक पांड्या नव्हे, तर आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनवले जाऊ शकते. भारताचा टी-20 कर्णधार होण्याच्या शर्यतीत सूर्या एक डार्क हॉर्स म्हणून समोर आला आहे. उपकर्णधार ते कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या हार्दिक पांड्याला तो मागे टाकू शकतो.

suryakumar yadav will be the captain of Team India till T20 World Cup 2026 hardik pandya
India Squads for Sri Lanka Series : जागा 1, दावेदार 3.... श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण? जाणून घ्या गंभीरची पहिली पसंती...

खरं तर, गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते. तेव्हापासून सूर्यकुमार यादव निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची पहिली पसंती ठरली आहे. याशिवाय सूर्या हा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचाही पर्याय आहे.

एवढेच नाही तर, पीटीआयच्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी (मंगळवार, 16 जुलै) संध्याकाळी पांड्याशी या योजनेतील बदलाबद्दल बोलले आहेत आणि त्यांना सांगितले की संघात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन पर्याय निश्चित करणे आवश्यक आहे.

suryakumar yadav will be the captain of Team India till T20 World Cup 2026 hardik pandya
Team India: 'विराट-रोहितची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण भारताकडे....', टीम इंडियाचे माजी बॅटिंग कोच काय म्हणाले?

गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये भारताच्या टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 मधून निवृत्ती घेतली. अशा परिस्थितीत कर्णधाराचा शोध सुरू होता. यासाठी अनेक नावे पुढे आली होती, त्यापैकी हार्दिक पांड्या हा सर्वात मोठा दावेदार होता.

मात्र, बोर्ड सूर्यकुमार यादवचा कर्णधार म्हणून विचार करत आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्याने वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यास नकार दिला आहे. मात्र, त्याआधी खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तो उपलब्ध असेल.

suryakumar yadav will be the captain of Team India till T20 World Cup 2026 hardik pandya
Gautam Gambhirनं इमोशनल केलं! KKR साठीच्या निरोपाच्या Videoत मनातलं सर्व काही सांगितलं

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठीचा संघ येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच नव्या कर्णधाराचीही घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी उपलब्ध आहे आणि त्याच्याकडून संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित होते, परंतु सूर्यकुमार यादव पण श्रीलंका मालिकेसाठी आणि 2026 च्या वर्ल्ड कपपर्यंत कर्णधार होणाची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.