Rohit Sharma : गुरु द्रविडचा पठ्ठ्या रोहित करणार होता 5 कोटींचे बलिदान पण... वाटणीवेळी काय घडलं नेमकं?

2024 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती.
Rohit sharma Rahul Dravid t20 world cup
Rohit sharma Rahul Dravid t20 world cup Sakal
Updated on

2024 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. बीसीसीआयने ही बक्षीस रक्कम खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांसह 42 सदस्यांमध्ये वाटली. ज्यामध्ये सर्वात मोठा भाग टी-20 वर्ल्ड कपमधील 15 सदस्यीय संघाचा आहे. पण जेव्हा ही बक्षिसाची रक्कम वाटली जात होती, तेव्हा रोहित शर्माने असे काही केले जे सर्वांची मन जिंकेल.

Rohit sharma Rahul Dravid t20 world cup
India Support Staff: नवा ट्विस्ट! गंभीरने संपूर्ण भारतीय स्टाफचा हट्ट सोडला; परदेशी खेळाडूसाठी BCCIकडे लावला वशीला

एका मीडिया रिपोर्टनुसार, बक्षीस रकमेचे वाटणी करताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सपोर्ट स्टाफला मोठा वाटा मिळावा यासाठी तो त्यांचा बोनस देण्यास तयार होता. वृत्तानुसार, भारतीय संघाच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्याने खुलासा केला आहे की, जेव्हा 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वाटली गेली तेव्हा रोहित शर्माने आवाज उठवला आणि सपोर्ट स्टाफला एवढी कमी रक्कम मिळू नये असे सांगितले. यासाठी तो आपला बोनस देण्यासही तयार होता.

Rohit sharma Rahul Dravid t20 world cup
'पडद्यामागे काय घडलं हे कोणाला माहीत नसतं...' पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाने शेअर केला 'तो' व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, बक्षीस रकमेपैकी सर्व 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील. याशिवाय टी-20 वर्ल्ड कप मुख्य प्रशिक्षक राहिलेला राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.

यापूर्वी राहुल द्रविडला 5 कोटी रुपये मिळणार होते, परंतु त्याला त्याच्या उर्वरित कोचिंग स्टाफप्रमाणेच बक्षिसाची रक्कम हवी आहे, त्यामुळे त्याने 5 कोटी रुपयांपैकी निम्मी म्हणजे 2.5 कोटी रुपये सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि राखीव खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.