USE vs BAN 1st T20I : अमेरिकेने बांगलादेशला चारली पराभवाची धूळ अन् रचला इतिहास

United States vs Bangladesh 1st T20I : बांगलादेशचा संघ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी यूएसए दौऱ्यावर गेला आहे.
USE vs BAN 1st T20I : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा अपसेट; अमेरिकेने बांगलादेशला चारली पराभवाची धूळ अन् रचला इतिहास
United States vs Bangladesh 1st T20Isakal
Updated on

United States vs Bangladesh 1st T20I : बांगलादेशचा संघ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी यूएसए दौऱ्यावर गेला आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 मे रोजी खेळला गेला. ज्यात बांगलादेशचा दारूण पराभव झाला.

बांगलादेश संघाच्या तुलनेत यूएसए थोडा कमकुवत मानला जात असला तरी, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेशचा पराभव करून अमेरिकेने यावेळी संकेत दिले आहेत की ते आगामी वर्ल्ड कपमध्ये मोठ्या संघांशी टक्कर देणार आहेत.

USE vs BAN 1st T20I : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा अपसेट; अमेरिकेने बांगलादेशला चारली पराभवाची धूळ अन् रचला इतिहास
KKR vs SRH : हैदराबादनं टॉस जिंकला अन् श्रेयस हसला; अहमदाबादमध्ये कमिन्स 'असा' हरला

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशला हरवून अमेरिकेने इतिहास रचला आहे. बांगलादेशवर अमेरिकेचा हा पहिला विजय आहे. हे दोन्ही संघ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच आमनेसामने आले. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून अमेरिकेने आपले खाते उघडले आहे. बांगलादेशच्या पराभवानंतर सोशल मीडियावर टीमची खूप खिल्ली उडवली जात आहे.

USE vs BAN 1st T20I : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा अपसेट; अमेरिकेने बांगलादेशला चारली पराभवाची धूळ अन् रचला इतिहास
KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 153 धावा केल्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तौहीदने सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. USA कडून गोलंदाजी करताना स्टीव्हन टेलरने 3 षटकात 9 धावा देत 2 बळी घेतले.

यानंतर अमेरिकेने 154 धावांचे लक्ष्य 19.3 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. अमेरिकेकडून कोरी अँडरसनने 34 आणि हरमीत सिंगने 33 धावा केल्या. या सामन्यातील चमकदार कामगिरीसाठी हरमीत सिंगला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. या विजयासह अमेरिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.