BAN vs NEP: टी20 वर्ल्ड कपच्या सामन्यात भर मैदानात राडा! बांगलादेशचा गोलंदाज रोहितला भिडला, ICC ने शेअर केला Video

T20 World Cup 2024: बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे दिसले होते.
Rohit Paudel and Tanzim Hasan Sakib engage in heated exchange
Rohit Paudel and Tanzim Hasan Sakib engage in heated exchange Sakal
Updated on

T20 World Cup 2024, Bangladesh vs Nepal: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध नेपाळ संघात सोमवारी सामना पार पडला. सेंट विन्सेंट येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने 21 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने सुपर-8 फेरीत प्रवेश मिळवला आहे. दरम्यान, हा सामना चालू असताना दोन्ही संघांच्या दोन खेळाडूंमध्ये वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.

झाले असे की बांगलादेशने नेपाळसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळला तांझिम हसन साकिबने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते.

त्याने तिसऱ्या षटकात पहिल्या पाच चेंडूत एकही धाव खर्च न करता दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने पाँइंटच्या दिशेने शॉट खेळला. त्यावेळी रोहितने केलेला बचाव पाहून साकिबने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला.

Rohit Paudel and Tanzim Hasan Sakib engage in heated exchange
T20 World Cup 2024 Super 8 : बांगलादेशची घोडदौड की पराभवाचा धक्का? ड गटामध्ये आज नेपाळशी लढत; नेदरलँड्‌स - श्रीलंकामध्ये लढत

त्यानंतर रोहित आणि साकिब यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसले, हा वाद एकाक्षणी इतका वाढला की अन्य खेळाडूंना दोघांमध्ये पडून त्यांना दूर करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्वबाद 106 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्याकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 17 धावा केल्या.

त्याशिवाय महमुद्दुलाह (13), रिषाद हुसैन (13), तस्किन अहमद (12), जेकर अली (12) आणि लिटन दास (10) यांनी दोन आकडी धावा केल्या.

नेपाळकडून गोलंदाजी करताना सोमपाल कामी, दिपेंद्र सिंग, रोहित पौडेल आणि संदीप लामिछाने या सर्वांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Rohit Paudel and Tanzim Hasan Sakib engage in heated exchange
T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

त्यानंतर 107 धावांच्या लक्ष्यचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 19.2 षटकात 85 धावांवर सर्वबाद झाला. नेपाळकडून कुशल मल्लाने सर्वाधिक 27 धावा केल्या, तसेच दिपेंद्र सिंग ऐरेने 25 धावा केल्या. तसेच असिफ शेखने 17 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावा करता आल्या नाही.

बांगलादेशकडून तांझिम हसन साकिबने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजूर रेहमानने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शाकिब अल हसनने 2 विकेट्स घेतल्या, तस्किन अहमदने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.