T20 World Cup 2024 Final : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma), सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. हिटमॅन रोहितने इथेही आपल्या सहकाऱ्यांची टिंगल उडवली. रोहितचा हा स्वभाव त्याच्या चाहता बनण्यामागच्या कारणांपैकी एक आहे. त्याची बोलंदाजी ऐकून प्रेक्षकांना खळखळून हसवले. यावेळी रोहितने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलच्या टेन्स क्षणाचा उल्लेख केला. त्यावेळी Rishabh Pant ने लढवलेल्या शक्कलचा रोहितने इथे आवर्जून उल्लेख केला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीच्या संयमी ७६ धावांना अक्षर पटेल ( ४७) व शिवम दुबे ( २७) यांच्या मॅच्युअर खेळीची साथ मिळाल्याने भारताने ही धावसंख्या उभी केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली होती. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेलाही धक्के बसलेच. क्विंटन डी कॉक ( ३९) व त्रिस्तान स्तब्स ( ३१) माघारी परतल्यानंतर डेव्हिड मिलर व हेनरिच क्लासेन यांनी आफ्रिकेला विजयी मार्गावर आणले होते.
पण, सूर्यकुमार यादवच्या एका अविश्वसनीय कॅचने सामन्याचे चित्र बदलले. भारताला ७ धावांनी हा सामना जिंकला. पण, या फायनलचा रोहितने किस्सा सांगितला अन् कसं ऋषभ पंतने सामन्याची गती संथ केली याची ट्रिक सांगितली. रोहित शर्मा म्हणाला, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूंत ३० धावा हव्या होत्या.. तेव्हा एक छोटासा ब्रेक घेतला गेला होता. त्यावेळी ऋषभने शक्कल लढवली. मी इथे फिल्डिंग लावत होतो आणि तो गुडघा पकडून मैदानावर बसला. फिजिओ येऊन त्याच्या पायाला पट्टी बांधत होते. तेव्हा आफ्रिकेचे फलंदाज ( मिलर व क्लासेन) हे झटपट सामना संपवण्याच्या मूडमध्ये होते. पण, पंतच्या आयडियाने सामन्याची गंती संथ केली आणि त्याचा फायदा आम्हाला झाला. पण, सामना जिंकण्याचे ते एकमेव कारण आहे, असे मी म्हणत नाही.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.