IND vs PAK, Video: पराभवाचं दु:ख सहन होईना… रोहितनं रडणाऱ्या नसीमला दिला धीर; पाकिस्तानचा एकटा भिडू लढला

Naseem Shah: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा नसीम शाह रडत मैदानातून बाहेर जाताना दिसला होता.
Naseem Shah | Rohit Sharma
Naseem Shah | Rohit SharmaSakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs Pakistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (9 जून) पार पडला. शेवटच्या चेंडूवरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवला.

त्यामुळे पाकिस्तानसाठी आता पुढील वाटचाल कठीण झाली आहे. अशातच पराभवानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह रडताना दिसला होता.

अखेरच्या षटकात पाकिस्तानाला विजयासाठी 18 धावांची गरज होती. या षटकात भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. त्याने पहिल्याच चेंडूवर इमाद वसीमला बाद केले. त्यामुळे नसीम शाह फलंदाजीला आला.

शेवटच्या तीन चेंडूत फलंदाजीसाठीही नसीम फलंदाजीसाठी स्ट्राईकवर होता. यावेळी पाकिस्तानला 16 धावांची गरज होती. त्यानेही पाकिस्तानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करताना सलग दोन चौकार मारले.

मात्र अखेरच्या चेंडूवर 8 धावा हव्या असताना भारताच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. त्यातच शेवटच्या चेंडूवर नसीमला एकच धाव घेता आली. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात विजयी ठरला.

Naseem Shah | Rohit Sharma
IND vs PAK: 'युनिवर्स बॉस' गेलचं लाखमोलाचं जॅकेट, भारत-पाकिस्तान खेळाडूंचे घेतले ऑटोग्राफ; पाहा Video

हा पराभव नसीमच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्याने या सामन्यात गोलंदाजीही चांगली केली होती. त्याने विराट कोहली, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या.

मात्र, पाकिस्तानचे फलंदाज 120 धावांचे लक्ष्य पूर्ण करू न शकल्याने पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर नसीमला त्याचे अश्रुही रोखता आले नाहीत. तथापि सामना संपल्यानंतर निराश झालेल्या नसीमला भारताचा कर्णधार रोहित शर्मा धीर देताना दिसला होता. त्यामुळे रोहितने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक होत आहे.

दरम्यान, पराभवानंतर परत मैदानातून जाताना नसीमला रडू कोसळले होते. त्यावेळी त्याला शाहिन शाह आफ्रिदी आधार देत असल्याचे दिसले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Naseem Shah | Rohit Sharma
Rohit Sharma Ind vs Pak : मॅचच्या मधीच रोहित शर्माचा 'तो' मेसेज ठरला गेम चेंजर, सामना संपल्यानंतर कर्णधाराने स्वतः केला खुलासा

या सामन्यात पाकिस्तानकडून 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. मात्र बाकी कोणाला 15 धावांच्या पुढे धावा करता आल्या नाहीत.

पाकिस्तान संघाला 20 षटकात 7 बाद 113 धावाच करता आल्या. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने 20 धावा केल्या, तर कर्णधार रोहित शर्माने 13 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत नसीम शाहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफनेही 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद अमीरने 2 विकेट्स घेतल्या, तर शाहिन आफ्रिदीला 1 विकेट मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com