T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

India Team Selection: आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी निवड समितीची जय शाह यांच्याबरोबर अहमदाबादमध्ये बैठक होणार आहे.
Team India | Ajit Agarkar | Jay Shah
Team India | Ajit Agarkar | Jay ShahSakal
Updated on

India Squad for T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जूनमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, आता नवीन माहिती समोर आली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अजित अगरकरच्या अध्यक्षतेखालील भारतीय संघाची निवड समिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना मंगळवारी (30 एप्रिल) भेटणार आहे.

अहमदाबादला होणारी त्यांची बैठक आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड अंतिम करण्यासाठी होईल. त्यामुळे आता मंगळवारी किंवा बुधवारी भारतीय संघाची अधिकृत घोषणा होऊ शकते.

Team India | Ajit Agarkar | Jay Shah
Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

वरिष्ठ पुरुष संघाच्या निवड समितीचे जय शाह संयोजक आहेत आणि सध्या ते त्यांच्या राजकीय वचनबद्धतेमुळे व्यस्त आहेत. त्यामुळे ही बैठक अहमदाबादमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.

त्याचबरोबर अशीही माहिती समोर आली आहे की या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. त्यातील दुसऱ्या यष्टीरक्षकाचा पर्याय आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याचे संघातील स्थान हे प्रमुख मुद्दे असतील.

कोणाची नावं चर्चेत?

दरम्यान, अशी चर्चा आहे की यष्टीरक्षकांच्या जागेसाठी ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि केएल राहुल शर्यतीत आहेत. त्यामुळे आता यांच्यातील एकालाच की दोघांना संधी मिळणार हे पाहावे लागेल.

Team India | Ajit Agarkar | Jay Shah
Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

त्याचबरोबर हार्दिक पांड्याही सध्या चालू असलेल्या आयपीएल 2024 स्पर्धेत फारशा चांगल्या फॉर्ममध्ये दिसलेला नाही. त्याला अद्याप फलंदाजी किंवा गोलंदाजीतही अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाहीये.

दरम्यान, या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याचे यापूर्वीच जय शाह यांनी स्पष्ट केले होते.त्यामुळे तो संघात असेल. त्याचबरोबर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यांची निवड निश्चित मानली जात आहे.

याशिवाय तिलक वर्माचाही विचार बैठकीत होऊ शकतो. तो पार्टटाईम फिरकी गोलंदाजी करू शकतो. याशिवाय संदीप शर्माबद्दलही चर्चा होऊ शकते. आयपीएल 2024 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.