New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

New Zealand announce T20 World Cup 2024 squad : टी-20 वर्ल्डकप 2024 साठी संघांची घोषणा सुरू झाली आहे.
New Zealand announce T20 World Cup 2024 squad
New Zealand announce T20 World Cup 2024 squad News Marathisakal
Updated on

New Zealand announce T20 World Cup 2024 squad : टी-20 वर्ल्डकप 2024 साठी संघांची घोषणा सुरू झाली आहे. याची सुरुवात न्यूझीलंडने केली आहे. आयसीसी स्पर्धेसाठी त्यांनी 15 खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांची कमान केन विल्यमसनच्या हाती आहे.

तर आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये फलंदाजीने चमकदार कामगिरी करणाऱ्या रचिन रवींद्रलाही संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध करणार आहे.

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड संघ (T20 World Cup 2024 New Zealand squad) - केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी.

New Zealand announce T20 World Cup 2024 squad
Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड संघाची कामगिरी आतापर्यंत चांगलीच राहिली आहे, पण त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघ चौथ्यांदा या मेगा स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

यापूर्वी, विल्यमसनच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाने अंतिम फेरी गाठली होती. 2022 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचा प्रवास उपांत्य फेरीपर्यंत मर्यादित होता.

New Zealand announce T20 World Cup 2024 squad
CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

न्यूझीलंडचा संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी क गटात आहे. न्यूझीलंडचा संघ 7 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपला प्रवास सुरू करेल, त्यानंतर त्यांचा सामना 12 जून रोजी यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. 14 जून रोजी किवी संघ युगांडा विरुद्ध तर 17 जून रोजी किवी संघ पापुआ न्यू गिनी विरुद्ध खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.