Team India T20 WC24 : IPL ची आकडेवारी पाहता हार्दिक पांड्या अन् KL राहुलचा टी-20 वर्ल्ड कप संघातून पत्ता कट?

T20 World Cup 2024 Team India : 2024 च्या ICC टी-20 वर्ल्ड कपची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी टी-20 वर्ल्ड कपचा थरार 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये रंगणार आहे.
T20 World Cup 2024 Team India
hardik pandya and kl rahulsakal
Updated on

T20 World Cup 2024 Team India : 2024 च्या ICC टी-20 वर्ल्ड कपची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी टी-20 वर्ल्ड कपचा थरार 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये रंगणार आहे.

आयसीसीने या स्पर्धेसाठी संघ घोषित करण्यासाठी 1 मे ही तारीख ठेवली आहे. या तारखेपर्यंत सर्व 20 देशांना आपापले संघाची घोषणा करायची आहेत. म्हणजेच भारतीय संघाचीही लवकरच घोषणा होणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडकर्ते या महिन्याच्या शेवटच्या तारखेला किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी संघ निवडण्यासाठी बसू शकतात.

T20 World Cup 2024 Team India
Virat Kohli : चेंडू कमरेच्या वर असतानाही विराटला का दिला आऊट, काय आहे नियम? डोके न खाजवता समजून घ्या

टीम मीटिंग दरम्यान इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील भारतीय खेळाडूंची कामगिरीही पाहिली जाईल. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच वर्ल्ड कप संघाची निवड केली जाईल, असे सांगितले होते. अशा परिस्थितीत आयपीएलची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्या आणि लखनऊ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुल देखील टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडीच्या शर्यतीत आहेत. मात्र, सध्याच्या आयपीएल हंगामातील या दोन खेळाडूंची कामगिरी तेवढी समाधानकारक म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत या दोघांना संघातून वगळले जाऊ शकते.

T20 World Cup 2024 Team India
IPL 2024 : सामना हरल्यानंतर RCB अन् पंजाबच्या कर्णधारांवर कडक कारवाई! BCCI ने ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

हार्दिक पांड्याला चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 7 डावात 146.87 च्या स्ट्राइक रेटने केवळ 141 धावा करता आल्या आहेत. हार्दिक पांड्या केवळ फलंदाजीतच फ्लॉप ठरला नाही, तर चेंडूसह त्याची कामगिरीही खराब झाली आहे. हार्दिकने सध्याच्या आयपीएलमध्ये 11 च्या खराब इकॉनॉमी रेटने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर केएल राहुलने सात सामन्यांत 143 च्या स्ट्राईक रेटने 286 धावा केल्या आहेत. जिथे राहुल आणि हार्दिक सारखे दिग्गज धावा काढण्यासाठी धडपडत आहेत. तिथे अभिषेक शर्मा, अभिषेक पोरेल, शशांक सिंग हे खेळाडू चांगली फलंदाजी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.