Team India Squad WC 2024 : पंत, संजू की इशान... टी-20 वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपर म्हणून कोण खेळणार?

T20 World Cup 2024 Team India Squad : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या हंगामात भारतातील आघाडीच्या खेळाडूंसोबतच अनेक युवा खेळाडूही चमकदार कामगिरी करत आहेत.
T20 World Cup 2024 Team India Squad
T20 World Cup 2024 Team India Squad News Marathisakal
Updated on

T20 World Cup 2024 Team India Squad : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या हंगामात भारतातील आघाडीच्या खेळाडूंसोबतच अनेक युवा खेळाडूही चमकदार कामगिरी करत आहेत. आणि या स्पर्धेवर निवड समितीचे बारीक लक्ष आहे. कारण आयसीसी वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघाची निवड कधी पण केल्या जाऊ शकते.

यंदाच्या हंगामात तीन यष्टीरक्षक फलंदाजही फलंदाजी करत आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन यांची नावे आहेत. तसेच युवा जितेश शर्माही या शर्यतीत मागे नाही. दरम्यान, महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲडम गिलख्रिस्टने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कोण विकेटकीपर असला पाहिजे यावर मोठे वक्तव्य केलं आहे.

T20 World Cup 2024 Team India Squad
MI vs CSK IPL 2024 : 'एल क्लासिको' मॅचआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! तुफान गोलंदाज सामन्यातून बाहेर

ॲडम गिलख्रिस्ट क्रिकबझवर म्हणाला की, "माझ्या मते, ऋषभ पंतला कोणत्याही किंमतीत जागा मिळायला हवी. यासोबतच मला संजू सॅमसनलाही संघात ठेवायला आवडेल. इशान किशनही चांगली कामगिरी करत आहे. यात काही शंका नाही. पण, मला वाटते की ऋषभ पंतचे नाव टी-20 वर्ल्ड कपसाठी लॉक केले जावे."

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंतने फलंदाजीसह महत्त्वाचे योगदान दिले. त्याने 24 चेंडूत 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

T20 World Cup 2024 Team India Squad
Video : 6,6,6,6,6,6 आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पठ्ठ्याने उडून दिली खळबळ, ठोकले 6 बॉलमध्ये 6 षटकार अन्...

डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावलेला ऋषभ पंत आयपीएलच्या या हंगामात मैदानात परतला. आणि या हंगामात पंत संघाचे नेतृत्व करत आहे. पंतने आतापर्यंत सहा सामन्यांत 157.72 च्या मजबूत इकॉनॉमी रेटने 194 धावा केल्या आहेत. या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सॅमसन चौथ्या स्थानावर आहे.

T20 World Cup 2024 Team India Squad
IPL 2024 : MI की CSK कोण गाजवणार मैदान... वानखेडे स्टेडियमवर शेवटचा खेळताना दिसणार MS धोनी?

बाकीच्यांबद्दल बोलायचं तर... इशान किशन सध्या मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 182.95 च्या स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 आहे. तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संजूने 6 सामन्यात 3 अर्धशतकांसह 246 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे जितेश शर्माला फलंदाजीचे कौशल्य दाखवण्याची फारशी संधी मिळालेली नाही. या उजव्या हाताच्या फलंदाजाने पाच सामन्यांत केवळ 77 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.