Hardik Pandya : मुंबईत पोहोचताच वर्ल्डकपची ट्रॉफी हार्दिकच्या खांद्यावर; Video होतोय व्हायरल

Hardik Pandya T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप 2024 वर नाव कोरलं. या विजयात उपकर्णधार हार्दिक पांड्याचा देखील सिंहाचा वाटा राहिला आहे.
Hardik Pandya
Hardik Pandya T20 World Cup 2024 Trophy esakal
Updated on

Hardik Pandya T20 World Cup 2024 Trophy : टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन येणारी टीम इंडिया पावसाळी वातावरणामुळं उशिरा मुंबई विमानतळावर पोहचली. मात्र ज्यावेळी टीम इंडिया मुंबईत दाखल झाली त्यावेळी एक वेगळंच दृष्य पाहावयास मिळालं. भारताचा कर्णधार रोहित शर्मा नाही तर उपकर्णधार हार्दिक पांड्या टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी आपल्या खांद्यावर घेऊन बाहेर पडला. त्यानं चाहत्याच अभिवादन स्विकारलं.

Hardik Pandya
Natasa Stankovic post viral :देवा माझं रक्षण कर... पांड्या मायदेशी परतताच पत्नी नताशाचा क्रिप्टिक मेसेज

वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत झालेला टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला. बार्बाडोसमध्ये झालेल्या वादळामुळं टीम इंडियाची घरवापसी तब्बल 4 दिवस लांबली होती. संघाने भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

त्यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली. हवामान खराब असल्यानं टीम इंडिया मुंबईत उशीराने दाखल झाली. विमान तळावरून टीम इंडिया बसमधून रवाना झाली. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची प्रचंड गर्दी आहे. अनेक चाहते रोहित शर्मासाठी तुफान पावसात देखील रस्त्यावर उतरले आहे.

Hardik Pandya
Team India Meets PM Modi: बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती? PM मोदींच्या प्रश्नावर रोहितनं काय दिलं उत्तर?

दरम्यान, दिल्ली विमानतळ, पंतप्रधानांचे निवासस्थान आणि मुंबई विमानतळावर पोहचेपर्यंत रोहित शर्मा हा ट्रॉफीसोबत होता. त्यानंतर मात्र संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने ट्रॉफी सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तो मुंबई विमानतळावरून ट्रॉफी उंचावतच बाहेर पडला. त्यानंतर ओपन टॉप बसमध्ये देखील ट्रॉफी हार्दिक पांड्याकडे होती.

फायनलमध्ये हार्दिक पांड्याने क्लासेन, डेव्हिड मिलर अन् रबाडाची विकेट घेतली होती. त्याने 20 धावात तीन विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.