भारतीय संघाने २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आणि जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांना घरच्या मैदानावरच खेळावे लागणार आहे. २०२६ ची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा भारत-श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरी सध्या सुरू आहेत आणि आशियाई गटातील पात्रता फेरीत गुरुवारी अजब विक्रम नोंदवला गेला. एका संघ १० षटकं खेळून १० धावांवर ऑल आऊट झाला... आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ही निच्चांक कामगिरी ठरली.
मंगोलिया संघाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नकोसा विक्रम नावावर केला. सिंगापूर संघाने त्यांना १० धावांत ऑल आऊट केले. मंगोलियाच्या संघाने १० षटकं फलंदाजी केली, परंतु त्यांना १० धावाच करता आल्या आणि ट्वेंटी-२०तील ही संयुक्त निचांक खेळी ठरली. इस्ले संघही १० धावांवर ऑल आऊट झाला होता.
सिंगापूरच्या हर्षा भारद्वाजने ३ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. मंगोलिच्या फलंदाजांनी त्याच्यासमोर नांगी टाकल्या. मंगोलियाच्या सहा विकेट्स पॉवर प्लेमध्येच गेल्या. अक्षय पूरीने दोन, तर राहुल शेशाद्री व रमेश कलिमुथूने प्रत्येकी १ विकेट घेतली.
मंगोलियाचे पाच फलंदाज भोपळ्यावर बाद झाले. सिंगापूरने फक्त पाच चेंडूंत हा सामना जिंकला. कर्णधार मनप्रीत सिंग गोल्डन डकवर माघारी परतला. पण, विलियम सिम्पसन ६ ( २चेंडू) व रौल शर्मा ७ ( २ चेंडू) धावा केल्या.
भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी यजमान म्हणून उभय संघ पात्र ठरले आहेत. त्याशिवाय आयसीसी क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड, पाकिस्तान यांनीही आपले स्थान पक्के केले आहे. युरोप क्वालिफायरमधून २ संघ, ईस्ट एशिया पॅसिफिक व अमेरिकन्स क्वालिफायरमधून प्रत्येकी १-१ संघ आणि एशिया व आफ्रिका क्वालिफायरमधून प्रत्येकी २-२ संघ उर्वरित ८ जागांसाठी पात्र ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.