T20 World Cup 2024: सूर्याची दहशत! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला दुसऱ्याने घेतलेल्या कॅचमध्येही दिसतोय आपला यादव

Suryakumar Yadav Catch in T20 World Cup: सोशल मीडियावरील एक व्हिडिओ पाहून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजालाही सूर्यकुमार यादवने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात घेतलेल्या झेलाची आठवण झाली.
Suryakumar Yadav Catch | Cricket Funny Video
Suryakumar Yadav Catch | Cricket Funny VideoSakal
Updated on

Tabraiz Shamsi Post: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जिंकले होते. भारताने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले होते.

या स्पर्धेत भारतासाठी अखेरच्या षटकात डेव्हिड मिलरचा सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. त्याने बाऊंड्री लाईनजवळ हा झेल घेतला होता. या झेलावर नंतर बरीच चर्चा झाली. त्यावर काही मजेशीर मीम्स आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

अशात एका गमतीशीर व्हिडिओवर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ताब्राइज शम्सीने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. पण त्याच्यावर नंतर टीका झाल्याने त्याने त्याचे स्पष्टीकरणही दिले. टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शम्सी देखील खेळला होता.

Suryakumar Yadav Catch | Cricket Funny Video
T20 World Cup साठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; एलिसा हेली कर्णधार, तर 'या' खेळाडूकडे उपकर्णधारपद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.