Tanush Kotian, मुंबईचा तारणहार अन् ‘खडूस’ खेळाडू! टीम इंडियाचा भविष्यातील R Ashwin

Mumbai Won Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने इराणी चषक उंचावला... शेष भारताविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिल्याने मुंबईला पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी घोषित केले गेले.
TANUSH KOTIAN
TANUSH KOTIANesakal
Updated on

Mumbai win the Irani Cup 2024 : १९९७-९८च्या हंगामात मुंबईच्या टीमने शेवटचा इराणी चषक उंचावला होता. त्यानंतर हा चषक हातात पकडण्यासाठी मुंबईला २७ वर्षे वाट पाहावी लागली. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ५३७ धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु शेष भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. अभिमन्यू ईश्वरनच्या शतकी खेळीने शेष भारताला ४१६ धावांपर्यंत पोहोचवले. मुंबईला दुसऱ्या डावात सारांश जैनने ईंगा दाखवला आणि ६ विकेट्स घेऊन कोंडीत पकडले. पण, तनुष कोटियन ( Tanush Kotian) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून मैदानावर उभा राहिला.

पृथ्वी शॉ याने ७६ धावांची आक्रमक खेळी केली खरी, परंतु दुसऱ्या डावात मुंबईचे फलंदाज गडगडले. ८ फलंदाज १७१ धावांवर मैदानावर परतल्यानंतर शेष भारताला विजयाचे स्वप्न पडू लागले होते. आता शेवटच्या दोन विकेट्स घेऊन उर्वरित ४५-५० षटकांत विजयी लक्ष्य सहज पार करू असे त्यांना वाटत होते. पण, तनुष कोटियन मैदानावर शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने मोहित अवस्थीला सोबतीला घेऊन १५८ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्याने १५० चेंडूंत १० चौकार व १ षटकाराच्या मदतीने ११४ धावांची नाबाद खेळी केली. अवस्थीने नाबाद ५१ धावा केल्या आणि मुंबईने ८ बाद ३२९ धावांवर डाव घोषित केला. हा सामना ड्रॉ असल्याचे जाहीर केले गेले आणि मुंबईला पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी घोषित केले गेले.

TANUSH KOTIAN
वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारा 'अभिमन्यू'! टीम इंडियात जागा 'डिझर्व्ह' करतो, पण...

तनुष कोटियन संकटमोचक...

मुंबईने एकूण ४२ वेळा रणजी करंडक, १५ वेळा इराणी चषक, ४ वेळा विजय हजारे ट्रॉफी आणि १ वेळा मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली होती. पण, मागील काही वर्षात ऑफ स्पिनर तनुष कोटियन हा मुंबईच्या संघाचा संकटमोचक म्हणून समोर आला आहे. तनुष कोटियनने डिसेंबर २०१८-१९ मध्ये सौराष्ट्रविरुद्ध रणजी पदार्पण केले. त्याने रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत शतकी खेळी आणि उपांत्य फेरीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला जेतेपदाच्या नजीक नेले होते. त्याच २५ वर्षीय कोटियनने आज शतक झळकावून मुंबईला २७ वर्षांनी इराणी चषक जिंकून दिला. १९९७-९८ च्या हंगामानंतर मुंबईने प्रथमच इराणी चषक उंचावला.

तनुषने या सामन्यात पहिल्या डावात ६४ धावांची खेळी केली होती आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर दोन्ही डावांत फिफ्टी प्लस धावा करणारा इराणी चषकाच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. तनुषने यापूर्वीही मुंबईसाठी अशी खेळी केल्या आहेत. २०२२ मध्ये गोवा विरुद्ध मुंबईची धावसंख्या ७ बाद २०८ असताना त्याने ९८ धावांची खेळी करून संघाला ९ बाद ३९५ ( डाव घोषित) पोहोचवले होते. २०२३ मध्ये महाराष्ट्रविरुद्ध ९३ धावांची खेळी करून तो संघाला ६ बाद २३८ धावांवरून ३८४ धावांपर्यंत घेऊन गेला होता. याशिवाय २०२४ मध्ये उपांत्य फेरीत तामिळनाडूविरुद्ध नाबाद ८९ धावांची खेळीने मुंबईला तारले होते.  

TANUSH KOTIAN
TANUSH KOTIAN esakal

तनुषने २९ प्रथम श्रेणी सामन्यांत ४१.०६च्या सरासरीने २ शतक व २१ अर्धशतकांसह १३८७ धावा केल्या आहेत. फलंदाजीतच नव्हे तर ऑफ स्पिनरने गोलंदाजीतही कमाल केली आहे. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८८ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये १९ सामन्यांत त्याने ९० धावा केल्या आहेत, तर २० विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-२०त २४ सामन्यांत २४ विकेट्स त्याच्या नावावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.